शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:35 IST

Chandrapur News DR. Sheetal Amte Suicide आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा होईल

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती.प्राप्त माहितीनुसार, सकाळी डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पती आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डॉ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डॉ. शीतल या घरात पडून होत्या. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डॉ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना वरोरा शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला.हायप्रोफाईल केस असल्यामुळे चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. नीलेश पांडे व ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी पोलीस ताफ्यासह आनंदवनातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानाची चौकशी केली. मात्र आत्महत्येबाबतचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. यानंतर चंद्रपूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या चमूने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनाही काही गवसले नाही. सायंकाळी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरूच होता.डॉ. शीतल आमटे-करजगी मागील काही महिन्यांपासून नैराश्येत असल्याचे समजते. यातूनच त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून आनंदवनात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सोशल मीडियावरून पुढे येत होते. अलीकडच्या काळात डॉ. शीतल यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांच्या पत्नी ही मंडळी आनंदवनातून बाहेर पडली होती. यानंतर त्यांचे वडील डॉ. विकास आमटे हेदेखील आनंदवनात वास्तव्यास नव्हते. ही सर्व मंडळी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे राहत होती. दरम्यानच्या काळात डॉ. शीतल यांनी सोशल मीडियावर महारोगी सेवा समितीवर काही आरोप केले होते. यावर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करून या आरोपांचे खंडन केले. यासोबतच डॉ. शीतल यांना मानसिक ताण असून त्या नैराश्येत असल्याचे नमूद केले होते. एकूणच या घडामोडीतून डॉ. शीतल या एकाकी पडल्या होत्या असे लक्षात येते. अशातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.कोरोना योद्धा म्हणून सत्कारप्रशासनाने कोरोना विषाणूविरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे सामील होऊन कार्य केले. या कायार्बाबत १५ आॅगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे सत्कार करण्यात आला होता.तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष तब्बल दोन तास चालले शवविच्छेदनडॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी आत्महत्या वा अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. कारेकर, डॉ. ढोबळे व डॉ. रामटेके या तीन तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी शवविच्छेदन सुरू झाले. ते रात्री ८ वाजतापर्यंत चालले. यानंतर ८ वाजून १५ मिनिटांनी मृतदेह वरोरा येथील आनंदवनकडे रवाना करण्यात आला.आमटे कुटुंबीय आनंदवनातडॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच आमटे कुटुंबीय गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून सायंकाळी आनंदवनात पोहचले. डॉ. शीतलचे वडील डॉ. विकास आमटे, आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांच्यासह डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, दिगंत आमटे ही मंडळी आनंदवनात येताच घरात गेली. त्यांनी या घटनेबाबत कुणाशीही संवाद साधला नाही.

टॅग्स :baba amteबाबा आमटेDr Sheetal Amteडॉ शीतल आमटे