शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:11 IST

वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने गंगापूर, ठाणेवासना ग्रामस्थांना झोडपून काढले असून घरावरील छप्पर उडाले. क्षतिग्रस्त घरातील साठवून ठेवलेले धान्यही पावसात भिजल्याने अनेक कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देवादळी पाऊस : धान्याचीही नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने गंगापूर, ठाणेवासना ग्रामस्थांना झोडपून काढले असून घरावरील छप्पर उडाले. क्षतिग्रस्त घरातील साठवून ठेवलेले धान्यही पावसात भिजल्याने अनेक कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. ही घटना बुधवारी घडली. प्रशासनाने चौकशी करून क्षतिग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.पोंभुर्णा तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक गावातील घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबीयांवर आघात झाला. तालुक्यातील मौजा- गंगापूर येथील अनेकांचे निवारेच जमीनदोस्त झाले. क्षतिग्रस्त बंडू पत्रुजी शिंदे, माधव महारू गुड्डी, लक्ष्मण चिमन्नाजी कलसार, प्रवीण लक्ष्मण कलसार, गणपती धर्मा शिंदे, भाऊजी शिवा डाहले, राजकुमार हसे, सुखराम पुंजाराम शिंदे, शरद ढवस यांच्या घरांची हानी झाली.तसेच ठाणेवासना येथील विनोद वसंत मेश्राम, विठोबा कोसरे, गुरुदास सोनटक्के, चतूर मेश्राम, मारोती मडावी, राजेश्वर मरस्कोले, अनिल कुळमेथे, बोडकू मडावी, विठ्ठल कुळमेथे, श्रीधर ऊरवते यांच्या घराची व धान्याची नासाडी झाली. पं. स. सदस्य गंगाधर मडावी यांनी क्षतिग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहे. लागलीच तालुका प्रशासनाने दखल घेतली आहे.