शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची शंका

By admin | Updated: September 2, 2015 00:39 IST

गडचांदुरातील नगरसेविकेच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचा अद्याप विसर पडला नसताना सोमवारी रात्री नांदा येथे डॉ.देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली. ..

पोलीस मारेकऱ्यांच्या मागावरदुहेरी हत्याकांडाने पंचक्रोशीत दहशतआशिष देरकर गडचांदूरगडचांदुरातील नगरसेविकेच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचा अद्याप विसर पडला नसताना सोमवारी रात्री नांदा येथे डॉ.देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली. या घटनेने सामान्य माणूस हादरून गेला असून पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. हे दुहेरी हत्याकांड आर्थिक व्यवहारातून झाले असल्याची शंका व्यक्त केली जात असली तरी अद्याप हत्याकांडाचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून तपासचक्रे फिरविली जात आहेत. मूळचे कोरपना तालुक्यातील कातलाबोडी येथील रहिवासी असलेले डॉ.देवराव जोगी हे वैद्यकीय व्यवसायासाठी ४५ वर्षांपूर्वी नांदा येथे स्थायिक झाले होते. त्यांना तिनही मुलीच असून त्या विवाहित आहेत. त्यामुळे डॉ.देवराव जोगी व त्यांच्या पत्नी सुधा जोगी हे दोघेच घरी असायचे. प्रार्थनेतील आवाज हरविलागुरूदेव भक्त असलेले डॉ.देवराव जोगी यांचे दातृत्व मोठे होते. मदतीसाठी त्यांच्या उंबरठ्यावर गेलेला माणूस कधीच रित्या हाताने परतला नाही. प्रत्येकाला ते मदत करायचे. राष्ट्रसंतांची सामुदायिक ध्यान व प्रार्थना हा त्यांचा नित्यक्रम होता. दररोज मंदिरात जाऊन ते भजनं गात त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आवाजाची जणू सवयच झाली होती. मात्र डॉ.जोगी यांच्या जाण्याने प्रार्थनेतील आवाजच हरविल्याची दु:खद भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. युवकांचा दाता नांदा परिसरात कोणतेही सामाजिक कार्य व धार्मिक उत्सव असो, त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी डॉ.देवराव जोगी यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या युवकांना सदैव मदत करीत असत. त्यामुळे युवकांचा दाता म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. ठोस धागेदोरे नाहीमंगळवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर श्वान पथकाने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत माग काढला. त्यामुळे मारेकरी तेथून पुढे निघून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मात्र मारेकरी कोण, याचे गूढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतले होते. त्यात चौघेजण होते. मात्र आम्ही टॉवरच्या कामासाठी आलो असल्याचे त्या चौघांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.