शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

दारूबंदीच्या तोंडावर मद्याची दुपटीने विक्री

By admin | Updated: March 30, 2015 00:39 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दारूबंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना,..

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दारूबंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना, मद्यविक्रेत्यांनी आपल्याजवळील साठा संपविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र बंदीच्या नावावर कोणत्याही प्रकारच्या मद्यासाठी दामदुपट दर आकारले जात असल्याने मद्यपींची चांगलीच लूट होत आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी येणार आहे. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तशा सूचनाही दिल्या. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबधीत ठाण्याच्या ठाणेदारांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहे. कोणत्याही ठिकाणी अवैध दारूविक्री होणार नाही, यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. यासाठी दारूविक्रेत्यांची धावपळ सुरू झाली असून आपल्याजवळील दारूसाठा संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक ते दीड महिन्यापुर्वीच नागपुरातील ठोक दारूविक्रेत्यांनी चंद्रपूरच्या दारूविक्रेत्यांना उधारीवर दारू पुरवठा करणे बंद केले. त्यामुळे बंदीसाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना दारूसाठा संपल्यातच असल्याचे दिसते. याचाच फायदा घेत तो, दारूसाठा दामदुपट दरात विक्री करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)