शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धोपटाळा वेकोलि प्रकल्पामुळे विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:46 IST

धोपटाळा वेकोलि प्रकल्पासमोरील अडचणी दूर झाल्या असून सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रकल्प विकासाला चालना देणार, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी (वा.) व वरोडा गावातील पोवनी-३ वेकोलि प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश वितरण करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : पोवनी-३ प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धोपटाळा वेकोलि प्रकल्पासमोरील अडचणी दूर झाल्या असून सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रकल्प विकासाला चालना देणार, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी (वा.) व वरोडा गावातील पोवनी-३ वेकोलि प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश वितरण करताना ते बोलत होते.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वेकोलिचे प्रबंध निदेशक आर. आर. मिश्रा, कार्मिक निर्देशक संजय कुमार, निर्देशक (तांत्रिक) मनोज कुमार, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंह, खुशाल बोंडे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, जि.प.चे सदस्य सुनिल उरकुडे, सरपंच भाऊजी कोडापे, सरपंच साईनाथ देठे उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, सुमारे १४४ कोटींचा आर्थिक मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. ७७२ प्रकल्पधारकांना नोकºया देण्यात येणार आहे. साखरी व वरोडा येथील दिव्यांग, वृध्द, महिला व अनुसूचित जमाती व इतर २८ प्रकल्पग्रस्तांना साडेसहा कोटींचे धनादेश प्रदान करण्यात आले. नागपूर वेकोलि मुख्यालयअंतर्गत आर्थिक मोबदल्याची रक्कम मंजूर झालेला पोवनी-३ हा पहिलाच प्रकल्प असल्याचेही ना. अहीर म्हणाले. केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पहिल्यांदाच कोळसा मंत्रालयाऐवजी नागपूर मुख्यालयाद्वारे ही रक्कम मंजूर करण्यात आली. या निर्णयामुळे अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नागपूर मुख्यालयाद्वारे मोबदला मिळण्याचा मार्ग सुकर झाला. अधिकाºयांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने या खाणीतील प्रकल्पग्रस्तांमध्ये मोबदल्यासंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. ना. अहीर यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळाला आहे.