शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात दगावली १३ जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

वढोली : तालुक्यातील करंजी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात १३ जनावरे मृत्युमुखी पडली. यामुळे करंजीतील पशुधन संकटात सापडले असून, ...

वढोली : तालुक्यातील करंजी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने महिनाभरात १३ जनावरे मृत्युमुखी पडली. यामुळे करंजीतील पशुधन संकटात सापडले असून, गावकरी हैराण आहेत. असे असताना पशुधन विभागाच्या असहकार धोरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यातच करंजी ग्रामपंचायतीत १६ फेब्रुवारीच्या पहिल्याच मासिक सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावातील कुत्र्यांना मारण्याचे फर्मान सोडले. मात्र, अजूनही गावात या गंभीर प्रकाराची दहशत कायम आहे. जनावरे दगावणे सुरूच असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता पशुधनाची काळजी सतावत आहे. परिणामी, पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात नागरिकांचा उदरनिर्वाह शेती, शेतमजुरीसह वेळेवर मिळेल त्या कामावर होतो. अशातच शेतीचा हंगाम आटोपल्यावर रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. यातच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने, बाहेर गेलेले मंडळी लॉकडाऊनच्या धास्तीने परतू लागली आहे. कोरोनामुळे जनसामान्याचे हाल होत असल्याचे चित्र आहे. यातच गोंडपिपरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने पशुधनही मोठे आहे. असे असताना आता तालुक्यातील करंजी गावात या महिन्याभरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्याने १३ जनावरे दगावली. आधीच कोरोनाच्या सावटात विवंचनेत दिवस काढत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अनेकांचे बैल मेल्याने येत्या हंगामाचीच वाट लागली आहे. लागलीच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी चावा घेणाऱ्या कुत्र्यांना मारण्याचे फर्मान सोडत १२ कुत्र्यांना मारले. ही मोहीम सुरू आहे. मात्र, गावात अजूनही कुत्र्यांची दहशत कायम आहे. यामुळे गावातील आबालवृद्धही भयभीत आहेत.

कोट

करंजीतील हा प्रकार गंभीर आहे. ग्रामपंचायतीने यावर कडक पावले उचलावी. अशा परिस्थितीत पशुपालकांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रसंगी तत्काळ औषधोपचार करून घ्यावा. उपचाराची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.

- सुनील उरकुडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प.चंद्रपूर