शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वन कार्यालयातील दस्तऐवज जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:45 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देअधिकाºयांचा दुर्लक्षितपणा : वन्यप्राण्यांचे चामडेही जळाल्याची चर्चा

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली. महत्त्वाची कागदपत्रे व सामान असताना त्याची देखभाल करण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हजारो रुपयांच्या साहित्यांसह महत्त्वाचे दस्तऐवज जळाले.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मूल येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे असून त्यांच्याकडे विशेष व्याघ्र दलाचादेखील प्रभार आहे. वन्यप्राण्यांच्या निगडीत महत्त्वाचा कारभार असताना ते केव्हाच जंगलात फिरताना दिसत नाही. त्यामुळे जंगलातील बांबूची फार मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यापासून ताटव्याची तस्करी केल्याचा प्रकार लोकमतने यापूर्वीच उजेडात आणला आहे. मात्र पुढे या प्रकरणात त्यांना ‘अभय’ देण्यात आले. दरम्यान, गुरुवारी त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महत्त्वाचे दस्ताऐवज व सामान जळाले. त्या सदनिकेत वीज पुरवठाच नसल्यामुळे शार्ट सर्कीटचा प्रश्नच निर्माण होत नाही. यात कुणीतरी आग लावली असल्याची चर्चा वनविभागात दबक्या आवाजात सुरू आहे.वनपरिक्षेत्र कार्यालय मूल येथे रात्रपाळीत एकनाथ कालेश्वरराव या वनमजुराला ठेवण्यात आले होते. त्या वनमजुराने रात्रीच्या वेळेस एका वन कर्मचाºयाला डिझेल चोरून नेताना बघितले होते. ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांना सांगिल्यानंतर एकनाथ कालेश्वरराव यांची बदली करून त्या जागेवर मद्यप्राशन करणाºया वनमजुराला नेमण्यात आले. यावरून कुंपनच शेत खात असावे, अशी चर्चा आहे. गुरुवारी जळालेल्या दस्ताऐवजात काही वन्यप्राण्यांचे चामडेदेखील असल्याची चर्चा आहे. अर्धवट जळालेले वन्यप्राण्यांचे चामडे घाई गडबडीत नेवून इतरत्र ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. वनविभागाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह आहे.