शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावर प्रभाव पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:14 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहितेसंदर्भात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेने अतिशय तटस्थपणे पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते. मतदानावर व मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घटनाक्रमाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थान न देणे म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे होय, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधाने सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या सर्व समित्यांचे प्रमुखदेखील या बैठकीला हजर होते.यावेळी प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन कशा प्रकारे करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले. एकदा आचारसंहिता अंमलात आली की अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे व नियमानुसार आपल्या अधिकाराचे वहन करणे, निवडणूक काळामध्ये अतिशय आवश्यक असून उपलब्ध असणाºया कायद्यांचे प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.निवडणूक काळामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाळणे, पदाधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणेचा वापर होऊ न देणे, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रचार साहित्याबाबत दक्षता घेणे, वाहनांचा योग्य वापर करणे तसेच या काळामध्ये राजकीय नेते व उमेदवारांपासून यंत्रणेने अलिप्त राहून काम करणे किती गरजेचे असते. हे आचारसंहितेतील नियमांचे दाखले देत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी निवडणूक काळात आचार संहितेचे पालन करताना कायम पुढे येणारे प्रश्न व त्याचे निराकरण याबाबत मार्गदर्शन केले. आजच्या बैठकीतदेखील व्हीव्हीपॅट मशीन व मतदान संयंत्राचे प्रात्यक्षिक सर्व अधिकाºयांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. मतदान पारदर्शी व निष्पक्षपणे कसे होणार, याचे प्रात्यक्षिकदेखील यावेळी दाखविण्यात आले.अधिकाऱ्यांनी सतर्क राहावेजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या अ‍ॅपवरील कोणत्याही आक्षेपाला शंभर मिनिटाच्या आत समाधानकारक उत्तर द्यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.