शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांकडे समाजाने दुर्लक्ष करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:47 IST

दिव्यांग हेदेखील समाजाचेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू असून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवाय, त्यांच्याप्रती समाज घटकांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : संगीतमय मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : दिव्यांग हेदेखील समाजाचेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू असून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवाय, त्यांच्याप्रती समाज घटकांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, असे मत वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केले.येथील दृष्टीहिन जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध संगीतकार रविंद्र जैन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून येथील बचत भवनात सावित्रीबाई फुले कन्या वसतिगृहाच्या मदतीसाठी नागपूर येथील रोशनी म्युजिकल नाईट कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष डी.पी. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा वाचनालयाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, रेवाराम कवाडे, लक्ष्मण खापेकर, दिलीप गेडाम, अजय गुप्ता, नंदू किरणापुरे, स्नेहा भाटिया, सीमा लाकडे, आयोजक सतीश शेंडे यांची उपस्थिती होती.यावेळी दिव्यांग कलावंतांनी विविध प्रकारची गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान १८ वर्षांखालील दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रकेट संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटपटू उमर शेख यांचा सत्कार चंदेल यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांगांच्या विविध योजनांचीही माहिती कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली. दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवण्याचा शासनाचा नियम आहे, यावर उपस्थितांनी भाष्य केले.डी.पी. जाधव, रेवाराम टेभूर्णीकर, लक्ष्मण खापेकर यांचाही सत्कार पार पडला. प्रास्ताविकातून संस्थेचे महासचिव सतीश शेंडे यांनी अंधांच्या वसतिगृहासाठी जागेची मागणी केली. दिव्यांगांच्या संगीतमय मेजवाणीचे रसिकांना चांगलीच भुरळ घातली. अंध कलावंतांनी गीत व नृत्याच्या अविष्कारातून रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले.