शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील देवदर्शनाला मनाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:55 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने आदिवासी बांधवांनी पर्यटकांचा रस्ता रोखून धरला होता. मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना बफर क्षेत्रातील जुनोना गेटवरून प्रवेश देण्यात आला.

ठळक मुद्देआदिवासींची मागणी : मोहुर्ली गेटवरच केली पूजा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने आदिवासी बांधवांनी पर्यटकांचा रस्ता रोखून धरला होता. मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना बफर क्षेत्रातील जुनोना गेटवरून प्रवेश देण्यात आला. दरवर्षी हाच प्रकार घडतो. त्यामुळे देवदर्शनासाठी वन विभागाने मनाई करू नये, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेला तातोबा देवाची मूर्ती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आहे. देवाची पूजा करण्यासाठी आदिवासी बांधवांकडून वनविभागाकडे परवानगी मागूनही नाकारली जाते. काही दिवसांपूर्वी शेकडो नागरिकांनी ताडोबात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलीस व वनविभागाच्या कर्मचाºयांनी हा प्रयत्न हाणून पाडला. बुधवारी पुन्हा सुमारे २०० आदिवासी बांधवांनी मोहुर्ली गेटवरून ताडोबात देवाची पूजा करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, प्रवेश नाकारल्याने मोहुर्ली गेटवरच ठिय्या दिला. देवाची पूजा करू देण्यासाठी प्रवेश नाकारत असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांनाही ताडोबात जाऊ देणार नसल्याची भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली. परिणामी, काही वेळ तणाव निर्माण झाला होता.मोहुर्ली गेटवर आदिवासी बांधव आणि वनविभागामध्ये प्रवेशावरून वाद उफाळून आल्यानंतर सकाळी पर्यटकांच्या वाहनांचा रस्ता अडविण्यात आला होता. ताडोबा प्रशासनाने मोहुर्ली गेटवरून जाणाºया पर्यटकांच्या वाहनांना जुनोना गेटवरून रवाना केले. आदिवासींचे दैवत असलेल्या तातोबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी संघर्ष होतो.तोडगा काढाताडोबा प्रशासनाने मोहुर्ली गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना जुनोना गेटवरून रवाना केले. दरम्यान, वनविभागाने प्रवेश नाकारल्याने मोहुर्ली गेटवरच देवाची पूजा करण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला. परंपरेनुसार देवाची पूजा केली. परंतु, देवाच्या दर्शनाची परवानगी घेण्यासाठी अडवणूक करणे चुकीचे आहे. निसर्ग व वन्य प्राण्यांना कोणतीही बाधा येऊ न देता पूजा केली जाते. त्यामुळे वन विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आदींनी केली.