शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खाण बंद न करता अन्य पर्यायांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:25 IST

हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि व्यवस्थापनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : लालपेठ खुल्या कोळसा खाणीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि व्यवस्थापनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. मात्र ही खाण बंद न करता वेकोलि व्यवस्थापनाने अन्य पर्यायाचा अवलंब करून तसेच पाचही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील कामगार याच ठिकाणी कार्यरत राहतील, अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिल्या.हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाण संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाची दखल घेत त्यांनी या खाणीला भेट देवून उपस्थित वेकोलि अधिकाºयांशी चर्चा केली. जोपर्यंत स्टेज १ व २ चा मार्ग मोकळा होणार नाही, तोपर्यंत कोळसा उत्खनन बंद राहील, अशी भुमिका अधिकाऱ्यांनी घेत खाणीत कार्यरत ४५० कामगारांपैकी २०० कामगारांना इतरत्रा हलविण्याची कार्यवाही वेकोलि व्यवस्थापनाकडून सुरू झाली असल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. यात हस्तक्षेप करण्याची मागणी वेकोलि कामगार व कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी ना. अहीर यांच्याकडे केली होती. त्यानुसार ना. अहीर यांनी प्रत्यक्ष ओपनकास्टला भेट दिली.याप्रसंगी क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुल सराफ, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजपा किसान आघाडी महामंत्री राजू घरोटे, उपक्षेत्रिय प्रबंधक ए. सी. हलदर, खाण प्रबंधक एन. के. मुंजेवार, युनियनचे पदाधिकारी बी. जी. दाभाडे, अभय तिवारी, भारतीय मजदूर संघाचे विजय आक्केवार, आयटकचे दिलीप बर्गी, संजय कांबळे, सीटूचे विठ्ठल कडू, सैय्यद, एचएमएसचे व्यंकटेश सुरा व पुरूषोत्तम गोंगले यांच्यासह खाण कामगार बहुसंख्यने उपस्थित होते.