शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी अडवणूक करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्याकरीता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करता यावा, म्हणून दूधाळू जनावरे देण्याची योजना सरकारने सुरू केली. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठक दिले.बैठकीला महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, अर्चना जिवतोडे, बँकेचे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, शेती आदी सर्वच बाबी उपलब्धही दुधाचे उत्पादन अल्प आहे. त्याकरीता दुग्ध विकास विभागाने पुढाकार घेऊन नागरिकांना गायी व म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उच्च जातीच्या गायी व म्हशी खरेदी करुन देण्यास पुढाकार घ्यावा, अशी सूचना ना. अहीर यावेळी दिली.जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कुकुटपालन व मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागांने शेतकऱ्यांशी संवाद साधावा. योग्य मार्गदर्शन करून आर्थिक प्रगती साध्य करण्यास मदत करावे, असेही त्यांनी सांगितले. आसोलामेंढा व अमलनाला प्रकल्पातील मत्स्यबीज केंद्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावे.मत्स्यव्यवसाय करणाºयांना मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावे. चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पडले आहे. त्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येवून हा प्रकल्प त्वरीत सुरु करावा, अशी सूचना महानगरपालिकेला दिली.शहरात मलनिस्सारण यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यात येवून नागरिकांना पाणी मिळेल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेत. त्या सर्व अर्जांची योग्य पडताळणी करुन सर्वांना न्याय द्यावा, असेही ना. अहीर या दृष्टीने विचार करण्यात यावा, असेही ना. अहीर यांनी सांगितले. वेंडर अ‍ॅक्ट, झरपट व इरई नदीचे सौंदर्यीकरण, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी राबविलेल्या योजनांची बैठकीत माहिती दिली.