शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,.....

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.मागील आठवडाभर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन ही दोन पिके चार दिवसांपासून पाण्याखाली आहेत. राजुरा, बल्लारपूर व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका अधिक असल्याचे जाणवते. राजुरा, बल्लारपूर कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तालुक्यात वैनगंगा वर्धा नदीचा फटका बसलेला आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकाचेदेखील यामध्ये नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकºयांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे सर्व पात्र शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे.प्राथमिक अंदाजानुसार ८ हजार १५३ हेक्टरमध्ये कापूस, १ हजार ३३२ हेक्टरमध्ये सोयाबीन व ८३० हेक्टरमध्ये धानाचे असे ८ हजार ८९८ हेक्टरमध्ये पुराचे पाणी शिरले. परिणामी २ हजार १७६ हेक्टरमध्ये पाणी थांबल्याने पिके धोक्यात आली आहेत.जिल्हा यंत्रणेने सोमवारपासून पंचनामे सुरू करावेत. अतिवृष्टीमुळे वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाली आहेत. जनजीवन सामान्य स्थितीवर येईल, यासाठीही प्रशासनाने कार्य करावे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagricultureशेती