शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीया मिर्झाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:48 IST

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया : उन्नत चुलीवर शेकल्या पोळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सदस्यांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विदर्भात आल्या होत्या. यावेळी त्यांनी डब्ल्यूटीआयद्वारे नागझिरा, नवेगाव, ताडोबा कारिडोरच्या गावांमध्ये तयार करण्यात येत असलेल्या उन्नत चुलींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्वत: त्या चुलीवर पोळ्या सुद्धा शेकल्या. त्यांनी स्वत: बालपणात पारंपारीक चुलींमुळे होण्याऱ्या धुरामुळे महिला व बालकांना त्रास होताना पाहिले. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ज्या महिला काही कारणास्त गॅस किंवा इतर साधनांचा उपयोग करीत नाही, त्यांच्यासाठी डब्ल्यूटीआयच्या उन्नत चुलींचे प्रयत्न वरदान असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अतिथींनी ग्राम गराडा व रामपुरी येथील महिलांनी तयार केलेल्या चुलीवर मातीच्या ताव्यावर बनविलेल्या पोळ्यांचा आस्वाद घेतला.या वेळी पेंच टायगर रिझर्वचे निदेशक रविकिरण गोवेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव प्रवीण परदेशी, एशियाचे निदेशक बिट्टू सहगल, वन्यजीवप्रेमी अनिलकुमार उपस्थित होते.जंगलांचे संरक्षण व महिलांचे आरोग्यया वेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे निदेशक एरिक सोलहेइम यांनी भारतात महिला उपयोगात आणत असलेल्या पारंपरीक चुली व उन्नत चुलींची कार्यपद्धती समजून घेतली. उन्नत चुलींमुळे महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होत असून लाकडांच्या कमी वापरामुळे जंगलांचे संरक्षणही होत असल्याचे सांगितले.तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतीय निदेशक अतुल भगई यांनी, देशात दरवर्षी जवळपास २.५ लाख महिलांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे आजारी होतात. त्यामुळे भारतीय महिलांनी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अधिक कुशल व पर्यावरणास अनुकूल तंत्राचा वापर करून महिलांचे आरोग्य व पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे, अशी पंतप्रधानाची इच्छा आहे. अशात डब्ल्यूटीआयच्या वतीने उन्नत चुलींचा कार्यक्रम अधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.