शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:34 IST

२८ मार्च रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांनी दिव्यांगांविषयी अपमानास्पद शब्दाचा वापर केला. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांचा खर्च बांधकाम विभागाकडे वळविण्याचे कटकारस्थान मनपा पदाधिकारी करीत आहेत.

ठळक मुद्देमनपाचा निषेध : भरीव निधीची तरतूद करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २८ मार्च रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांनी दिव्यांगांविषयी अपमानास्पद शब्दाचा वापर केला. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांचा खर्च बांधकाम विभागाकडे वळविण्याचे कटकारस्थान मनपा पदाधिकारी करीत आहेत. या धोरणांच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख व प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाप्रमुख निलेश पाझारे यांच्या नेतृत्वात शेकडो अपंगांनी बुधवारी महानगर पालिकेसमोर निदर्शने केली.दिव्यांगांबाबत शासनाकडून वेळोवेळी निघालेल्या आदेशानुसार अति तीव्र दिव्यांग यांना मासिक वेतन, स्वयरोजगारांसाठी अर्थ साहाय्य व प्रशिक्षण, बचत गटांना अनुदान, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी उपयुक्त अशा योजना राबविणे आवश्यक आहे.दिव्यांगांची नोंदणी करून त्यांच्यासाठी मनपाच्या एकूण महसुली उत्पन्नाचा ३ टक्के निधी राखून ठेवणे, समान हक्क, संधीचे संरक्षण व संपुर्ण सहभाग अधिनियम १९९५ नुसार राखुन ठेवणे आवश्यक आहे. मात्र २०१२ पासून मनपाने दिव्यांगासाठी निधीची पुरेशी तरतूद केली नाही. जेवढ्या निधीची तरतूद करण्यात आली तो खर्च करण्यात आला नाही. एकीकडे अवहेलना करायची व हक्क मागणाऱ्या दिव्यांगाचा अपमान करायचा. या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात शहरातील बहुसंख्य दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक जयस्वाल, नगरसेवक स्नेहल रामटेके, मुन्ना खोब्रागडे, शिवशंकर कोलते, पंकज मिश्रा, शिवसागर चंदनखेडे, सतिश मुल्लेवार, उत्तम साव, अपरिल चौधरी, स्नेहल कन्नमवार, कल्पना शिंदे, रंजीता विस्वास, रंजना निमगडे, भाग्यश्री कोलते, मनोज पिपरे, नंदाजी सातपुते, हिरा सोंदरकर, संध्या डोंगरे आदींचा सहभाग होता. यावेळी मनपा पदाधिकाºयांच्या निषेध करण्यात आला. त्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांना २०१२ पासूनच्या अनुशेषासह दिव्यांग कल्याण निधीची तरतूद करण्यात यावी, दिव्यांगांच्या नोंदणीकरिता प्रसिद्धी करून नोंदणीचा कार्यक्रम पुढील १० दिवसात पूर्ण करावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.