चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून संदीप दिवाण लवकरच येत आहेत. गृहमंत्रालयाने बुधवारी सायंकाळी पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आणि पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यात नाशिकचे पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्याही नावाचा अंतर्भाव आहे.चंद्रपूरचे विद्यामान जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांचे स्थानांतरण लाच लुपचत प्रतिबंधक विभागाचे नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक या पदावर झाले आहे. २२ मे २०१२ रोजी राजीव जैन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून रूजू झाले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती. आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून ते नागपूरला जात आहेत.अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव यांचेही स्थानांतरण झाले असून त्यांना अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यांच्या जागेवर मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल कडसणे येत आहेत. येत्या आठवडाभरातच नवे अधिकारी आपल्या पदावर रूजू होत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)गुन्हे विश्वात वचकनवे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांचा गुन्हेगारांच्या विश्वात मोठा वचक आहे. नाशिकला ते याच विभागात कार्यतर होते. या सोबतच पोलीस प्रशासकीय विभागातही त्यांनी बराच काळ सेवा दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर संदीप दिवाण येथे येत असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याला अपेक्षा आहेत.
दिवाण नवे जिल्हा पोलीस अधीक्षक
By admin | Updated: May 14, 2015 01:41 IST