शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट सात हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:10 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचे फलित : लाभार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.मागील सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत सदर योजनेसाठी एकून उद्दिष्टात युती सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे. शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने याबाबत शुक्रवारी परिपत्रक जारी केले. सन २०१८-१९ या वर्षाकरिता ४ हजार ५०० मंजूर उद्दिष्ट होते. त्यामध्ये २ हजार ५०० अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ७ हजार झाले आहे.जानेवारी २०१९ मध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकूल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दिष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनाला आली होती. परिणामी, संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यासाठी त्याच बैठकीत तत्काळ निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टात २ हजार ५०० घरकूलांनी वाढ झाली आहे. याआधी २०१०-११ मध्ये ५१२, सन २०११-१२ मध्ये ९५०, सन २०१२-१३ मध्ये ३७०, सन२०१३-१४ मध्ये २२०, सन २०१४-१५ मध्ये १ हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात ३ हजार ५२ आणि २०१५-१६ मध्ये ३९० सन २०१६-१७ मध्ये १ हजार २५२, सन २०१७-१८ मध्ये २ हजार तसेच सन २०१८-१९ मध्ये सात हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात १० हजार ६४२ इतके उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत युती सरकारच्या कार्यकाळात उद्दिष्टातील ही वाढ तिप्पट झाली आहे.ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर योजनेचे एकूण उद्दिष्ट सात हजार झाले आहे. त्यामुळे रमाई आवास योजनेचा लाभ घेणाºया नागरिकांची अडचण दूर झाली आहे. या योजनेपासून आता पात्र कुटुंब वंचित राहणार नाही.