शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७३.७५ टक्केवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण १२६ बाधित पुढे आले आहे.

ठळक मुद्देनव्या १२६ बाधितांची नोंद। केवळ २९४० रुग्णांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना काळात मागील काही दिवसात जिल्ह्यात दिलासादायक गोष्टी घडत आहेत. आधी बाधितांची संख्या कमी झाली. मृत्यूची संख्याही कमी झाली. आता कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७३.७५ टक्क्यावर पोहचला आहे.जिल्ह्यात शनिवारी १२६ नवीन बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता ११ हजार ८९० वर पोहोचली आहे. आतापर्यंत आठ हजार ७६९ कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या दोन हजार ९४० आहे.नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण १२६ बाधित पुढे आले आहे.चंद्रपूर शहरातील व परिसरातील एकोरी वार्ड, नगीनाबाग, जुनोना चौक शांतीनगर, बाबुपेठ, रामनगर, आरवट, श्रीराम नगर, जगन्नाथ बाबा नगर, जटपुरा वार्ड, महाकाली वार्ड, पठाणपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, अंचलेश्वर वॉर्ड भागातून बाधित पुढे आले आहे.याशिवाय बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, बामणी, गणपती वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील माला कॉलनी परिसर, जवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील शेबंळ, आनंदवन, चिनोरा परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर, चिखलगाव, खेड, बालाजी लेआउट परिसर, अजुर्नी मोरगाव, चौगान, देलनवाडी, कुरझा, शांतीनगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलनी परिसर, चिचोर्डी, श्रीराम नगर, सूर्य मंदिर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, पळसगाव, देवाडा, लोनवाही, मुरमाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, चिखलगाव, जीवनापूर, गिरगाव,कोजबी, वाढोणा, प्रियदर्शनी चौक परिसर, महात्मा फुले चौक, डोंगरगाव, वढोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील राजोली परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव भागातून बाधित पुढे आले आहे.एका बाधिताचा मृत्यूशनिवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भिवापूर वार्ड बाबुपेठ, चंद्रपूर येथील ७५ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ७ ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १८१ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १७२ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित मृत्यू चंद्रपुरात झाले असले तरी ते इतर जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या