शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पाणी संकटाच्या सावटात

By admin | Updated: August 10, 2014 22:52 IST

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सोडा; सर्वसामान्य नागरिकांचेही समाधान केले नाही. अतिशय कमी आणि तोही टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणी मुबलक प्रमाणात साठू शकले नाही.

शेतकऱ्यांची चिंता वाढणार : सिंचन प्रकल्पात निम्माच जलसाठाचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सोडा; सर्वसामान्य नागरिकांचेही समाधान केले नाही. अतिशय कमी आणि तोही टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणी मुबलक प्रमाणात साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई आणि चारगाव प्रकल्प सोडला तर उर्वरित सिंचन प्रकल्पातील जलसाठा पाहिजे तसा नाही. परिणामी पुढे जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात सापडण्याची भीती आहे.चंद्रपूर शहरात यंदा प्रारंभापासूनच पावसाने हुलकावणी देणे सुरू केले. मृग नक्षत्र बरसलाच नाही. विलंबाने का होईना, पाऊस येईल, ही आशा होती. मात्र पावसाने ही आशा फोल ठरविली. त्यानंतर हवामान खात्यानेही मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता काय होणार याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वाना वाटू लागली. दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पेरणीच्या कामांना प्रारंभ केला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नंतर बरेच दिवस तो गायबच राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले.जुलै महिन्यात पाऊस आला. मात्र एकदोन वेळचा अपवाद वगळला तर त्याचे बरसणे रिमझिम स्वरुपाचेच होते. त्यामुळे या पाण्याची बऱ्यापैकी साठवणूक होऊ शकली नाही. परिणामी आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लोटल्यानंतरही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पे अर्धे रिकामेच राहिले. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात दोनचारदा ओव्हरफ्लो झालेले इरई धरण यावेळी ६६.४७ टक्केच भरू शकले. केवळ चारगाव व चंदई हे कमी क्षमतेचे धरणच तुडूंब भरू शकले. इतर धरणाची स्थिती आज चांगली वाटत असली तरी पुढे चिंता वाढविणारी आहे. आसोलामेंढा धरणात ५९.६२ टक्के जलसाठा आहे. घोडाझरी प्रकल्पात ४२.९९ टक्के पाणी आहे. सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर प्रकल्प अगदी १०.२३ दलघमी क्षमता असूनही केवळ ५२.९१ टक्के भरू शकला. लभानसराड प्रकल्पाची हीच अवस्था आहे. ७.३५१ दलघमी क्षमता असून या प्रकल्पातही केवळ ५०.३९ टक्के पाणी आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव व अमलनाला प्रकल्प तर चिंताजनक अवस्थेत आहेत. पकडीगुड्डम प्रकल्पात केवळ १०.५१ टक्के जलसाठा आहे. डोंगरगाव धरणात १६.४४ तर अमलनाला धरणात २२.८८ टक्केच जलसाठा आहे. सिंचन प्रकल्पातील ही स्थिती आजची वेळ कशीबशी निभावून नेईन. मात्र पुढे पाऊस आला नाही तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. पीक जेव्हा भरात येते. तेव्हा पावसाची सिंचनाची गरज पडते. त्यावेळी शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. आॅगस्ट महिना पावसाचा शेवटचा महिना समजला जातो. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसते. मात्र आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लोटला. मात्र पावसाचा अंदाज नाही. ढगाळ वातावरणही कुठे दिसत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यातील धरणात जेवढा जलसाठा आहे, तो झपाट्याने कमी होणार आहे. आणि त्यानंतर पुढे वर्षभर एवढ्या जलसाठ्यात पाण्याचे नियोजन करताना व उद्योगांनाही सांभाळताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.(शहर प्रतिनिधी)