शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

मुद्रा योजनेत जिल्हा आदर्श व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:08 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील दहा हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा या योजनेत आदर्श जिल्हा म्हणून पुढे आणताना या वर्षामध्ये किमान दहा हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी दिले.स्थानिक नियोजन भवनात आयोजित मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुद्रा बँक योजना राबविताना बँकांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधींनीदेखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. खानापूर्ती करण्यासाठी ही योजना नसून यातून खरोखर उद्योजक उभे झाले पाहिजे. गुजरातमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांना उद्योगधंद्याची आवड आहे, त्या सर्वांना यातून संधी दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आमदार अनिल सोले, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील कोणते उद्योग उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अन्य विभागाची मदत घ्यावी, असे आ. अनिल सोले म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावाचंद्रपूर जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपापल्या भागातील उद्दिष्ट निश्चित करावे. मुद्रा बँक कर्ज देणारा, त्याची परतफेड करणारा आणि त्यातून उद्योग उभारणारा उमेदवार देण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येवून केल्यास मुद्रामधील योग्य उमेदवारांना लाभ मिळणे व या योजनेचा योग्य वापर होणे शक्य आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासोबतच या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सर्व यंत्रणांनी पुढे येण्याबाबतही त्यांनी सांगितले.२३० कोटींचे कर्ज दिलेबैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षात मुद्रा योजनेतून वाटप करण्यात आलेल्या कर्ज पुरवठयाबाबतही माहिती दिली. मुद्रा योजनेतून २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हयात १७ हजार ५०० खातेदारकांना १६० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर १ एप्रिल २०१८ पासून सप्टेंबर महिना अखरेपर्यंत ७० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी तीन गट तयार करण्यात आले आहे.