शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:18 IST

तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी मिळणार असल्याने परिसराच्या विकासाला गती येईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.

ठळक मुद्देनिधीची तरतूद : ब्रह्मपुरी तालुक्यातील अडचणी दूर होणार

ब्रह्मपुरी : तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी मिळणार असल्याने परिसराच्या विकासाला गती येईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोल्हारी या रस्त्यावरील वैनगंगा नदीवर मोठ्या उंचीचा पुल व बंधाºयाचे बांधकाम करून भंडारा जिल्ह्यातील इटाण गावाला जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे दळणवळणाची व्याप्ती वाढणार असून जिल्हा मार्गाला जोडण्यात येणार आहे. कालेता ते नान्होरी या रस्त्यासाठी प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली. २०१९ - २० ला हे काम सुरू होणार आहे. रस्ते विकास योजना -२००१ मधील जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या लांबीत २० किमी वाढ होणार आहेत. तसेच इतर जिल्हा मार्गाच्या जिल्हा लांबीचाही विस्तार होणार असल्याने या मार्गाचा दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव प्रादेशिक मुख्य अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला होता.सोमवारी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली त्यामुळे ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी, तोरगाव, देउळगाव, बेलगाव, कोलारी या मार्गावरून दळणवळणाला गती येणार आहे.