शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार : डॉ. भारती पवार

By राजेश मडावी | Updated: December 29, 2023 15:36 IST

विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. प्रसंगी रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला टेलिकन्सलटन्सीने जोडण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चंद्रपुरात गुरुवारी (दि. २८) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. सीईओ विवेक जॉन्सन, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पावडे उपस्थित होते. राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी खनिज विकास निधीच्या बैठकीत काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आरोग्य क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सुविधांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून, या निधीतून अनेक कामे केली जात आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

लॅबसाठी प्रस्ताव आल्यास एक कोटी देणारकोरोना काळात पीएम रिलिफ फंडातून पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात १४ कोटींचा निधी देण्यात आला. उच्च दर्जाच्या लॅबसाठी प्रस्ताव आल्यास १ कोटीचा निधी उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य सुविधांसाठी आतापर्यंत ४८ ते ५० कोटींचा निधी मिळाल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

५ लाख लाभार्थ्यांना कार्ड वितरणजिल्ह्यातील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट सुरू आहे. टेलिकन्सलटन्सीने ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरेाग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आली. काही ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत. १७ लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड दिले जाणार असून, ५ लाख लाभार्थ्यांना वितरण केले. साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य सज्ज व तत्पर असल्याचे डॉ. पवार या वेळी नमूद केले.

टॅग्स :Bharati pawarभारती पवार