शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुमारे दोन लाख लस साठवणुकीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गात सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नरत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.  याशिवाय ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने ही लस देण्यासाठी प्रशासनाने तसा डेटा तयार केला आहे. लस उपलब्ध होण्याची आता प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देलसीकरणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी : कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

  रवी जवळे    लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनावरील लस जानेवारी महिन्यात येणार असल्याच्या अंदाज आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. लस आलीच तर ती सर्वप्रथम आरोग्यसेवेतील १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. ही लस साठवणूक करण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. जवळपास दोन लाख लस सुखरूप ठेवता येणार आहे. याची क्षमता १० हजार लिटर आहे.कोरोना संसर्गात सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नरत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे. याशिवाय ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने ही लस देण्यासाठी प्रशासनाने तसा डेटा तयार केला आहे. लस उपलब्ध होण्याची आता प्रतीक्षा आहे.

शितगृहाची व्यवस्थाकोविड-१९ या विषाणूवरील लस ० ते ८ डिग्री सेल्सीयस तापमानातच ठेवावी लागते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे रेफ्रीजरेटर आरोग्य विभागाने खरेदी केले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.  

लस ठेवण्याचे जिल्ह्यात ७८ ठिकाणकोरोनावरील लस जिल्ह्यात उपलब्ध झालीच तर ती ठेवण्यासाठी जिल्ह्यात ७८ शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील सात गृहे मनपा हद्दीत असतील. १३ उपजिल्हा रुग्णलयाच्या ठिकाणीदेखील लस ठेवता येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस ठेवण्यासाठी शितगृहे सज्ज केली आहेत. 

वाहतुकीसाठी ७२ गाड्याआरोग्य विभागाकडे एक वॅक्सीन वाहन आहे. या वाहनाने नागपूरवरून लस जिल्ह्यात आणल्या जाणार आहे. त्यानंतर १३ उपजिल्हा रुग्णालय व ५८ पीएचसीच्या रुग्णवाहिकांनी ही लस ठिकठिकाणी पाठविली जाणार आहे.

कोरोना विषाणूवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. तयारी अंतिम टप्यात आहे.   दोन लाख लस साठवणुकीची क्षमता आपल्याकडे असणार आहे. जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस साठवणूक करून ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. - डॉ. राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या