शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:41 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले.

ठळक मुद्देवरूणराजाचा दगा : ८८ टक्के धान करपण्याच्या मार्गावर, नदी, नाले, प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले. परिणामी अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. कसेबसे पीक वाढले, तर ते जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी-नाले एकदाही दुथडी भरून वाहले नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही अद्याप कोरडेच आहे. यामुळे जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात दिसत आहे.नद्या, नाले अजूनही तहानलेलेच दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या यंदा पावसाळा संपूनही कोरड्याच आहेत. दरवर्षी या कालावधीत नद्या दुथडी भरून वाहात असत. वर्धासारख्या मोठ्या नदीत जेमतेम पाणी आहे. इतर नद्यांचे तर पात्र कोरडेच आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची चाहुल लागत आहे. काही ठिकाणी पावसाळ्यातच उन्हाळ्यागत स्थिती आहे.पाण्यामुळ शेतपिके धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकटाची चिन्हे दिसत आहे. खरीप हंगामच पाण्याविना जात आहे तर रब्बीची पिके कशी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यात वर्धा नदीसारख्या मोठ्या नद्या बारमाही पाणी वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नद्यांच्या तीरावरील गावांना पुराचा फ टका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येत असते. मात्र यंदा पावसाळा संपत आला असला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहेत. लहान नाले तर पाण्यासाठी आतुर झालेले आहेत. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आलेला नाही. परिणामी आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचे संकेत देत आहे.राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात या पावसाळ्यात १० टक्केच पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. गावातील तलावांमध्ये ठणठणाट आहे. पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न शेतकºयांची चिंंता वाढविणारा ठरत आहे. यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाउस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मात्र हा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ १५ ते २० टक्के इतकी आहे. आॅगस्ट महिन्यात केवळ काही दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे. यावर शासनाने आताच उपाययोजना करावी, अन्यथा पाण्यासाठी वनवन भटकण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.