शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका क्षेत्रात रोजगार देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी, बोथली, ब्राह्मणी, डोंगरगाव, नवखळा, तुकूम या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नगर परिषदेत समाविष्ट होण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांचे शेती आणि रोजगार हमीची कामे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगर परिषद क्षेत्रातही ग्रामीण मग्रारोहयोच्या धर्तीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील नगर परिषदेस दिले आहेत. त्यामुळे आता नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे. नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी, बोथली, ब्राह्मणी, डोंगरगाव, नवखळा, तुकूम या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नगर परिषदेत समाविष्ट होण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांचे शेती आणि रोजगार हमीची कामे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मात्र, नगर परिषदेत समावेश झाल्यापासून या गावातील नागरिकांना रोजगार हमीच्या कामापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, या नागरिकांच्या आर्थिक अडचणीत चांगलीच वाढ झाली असून यातूनच रोजगाराची ही मागणी पुढे आली होती. शेतीची कामे संपली की, या गावातील लोकांना कोणतीही कामे नसतात. नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतीची कामे चालतात. पण, त्यानंतर या लोकांना रिकामेच राहावे लागते. तसाही नागभीड नगर परिषदेचा दर्जा ‘क’ आहे. शासनाच्या एका निर्देशानुसार क वर्गात असलेल्या नगर परिषदांकडे कार्यक्षेत्रातील नागरिकांनी रोजगाराची मागणी केली, तर रोहयोमधून रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही शासनाकडून दिल्या आहेत. या निर्देशाचा आधार घेऊनच ब्राह्मणीवासीयांनी ही मागणी केली होती. नुसती मागणीच नाही, तर ५६७ व्यक्तींनी नमुना फाॅर्म क्रमांक ४ भरून दिले होते.

तलाव व नाला    खोलीकरणाची कामेनागभीड नगरपरिषद खेड्यांची मिळून बनली आहे. या खेड्यांमध्ये त्यावेळच्या ग्रामपंचायतींनी नियोजन करून, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्षलागवड, पांदण रस्ते आदी विविध बाबींवर रोजगार उपलब्ध करून दिला होता. असेच किंवा शासनाने क वर्गातील नगरपरिषदांना रोजगार हमीच्या कामांबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त होत आहेत.

क वर्गातील न.प. क्षेत्रातील नागरिकांना मग्रारोहयोच्या धर्तीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे जुनेच निर्देश आहेत, पण नागभीड न.प.कडून या निर्देशाची अंमलबजावणी होत नव्हती. या संदर्भात मी लोकांकडून रोजगाराचे फार्म भरून घेतले व पाठपुरावा केला. त्याचे हे फलित आहे.- अमृत शेंडे, माजी सरपंच बाह्मणी.

 

 

टॅग्स :jobनोकरी