शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:41 IST

रिपाइंचे (आ)े राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा ठराव नुकताच घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूर्तता करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रिपाइंचे (आ)े राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा ठराव नुकताच घेण्यात आला. त्या ठरावानुसार चंद्रपूर शहर तथा जिल्हा रिपाइं (आ) च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भिमा कोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचनाऱ्या आरोपींना अटक करावी, एकबोटे प्रमाणे संभाजी भिडेला अटक करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करू नये, दलिताविरुद्ध कलम ३९५ नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणे बंद कराव, पदोन्नतीमध्ये अनुसुचित जाती, जमातीला आरक्षण देण्यासाठी लवकर कायदा करावा, अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काऱ्यांना पकडून कडक शासन करावे, बलात्कार व अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा समिती नेमण्यात यावी, तसेच सुरक्षा समितीमध्ये राजकीय व्यक्तींना वगळून सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करावी, चंद्रपूर शहर तथा जिल्हा संपूर्ण देशातच अतिउष्ण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सुरुवातीचे १०० युनिटवर शुल्क आकारणी बंद करुन १०१ युनिटनंतर सवलतीच्या दरात रक्कम आकारण्यात यावी, प्रदूषण पसरविणाऱ्या कारखाण्यास ताळे ठोकण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोेटेकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजू जंगम, सिद्धार्थ पथाडे, बाळू कृणाल आमटे, संदीप जंगम, संजय तिवारी, अ‍ॅड. शैलेंद्र देशकर, कविता निखारे उपस्थित होते.