शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा, तालुका न्यायालय उघडले मात्र बाररूम बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.

ठळक मुद्देवकिलांना बसण्यास अडचण : जिल्हा व सत्र न्यायाधिशांना बार असोसिएशनचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्हा व तालुका न्यायालयाचे कामकाज दोन सत्रामध्ये सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वकीलांच्या बसण्याची खोली म्हणजे बार रूम बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्याची मागणी चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधिशांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जिल्हा न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले होते. केवळ आरोपींची हजेरीव तातडीच्या जामिन अर्जांवरील सुनावण्यांसाठीच ठराविक न्यायालयांचे कामकाज सुरू होते. आता यात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली.त्यामुळे न्यायालयाची संख्या वाढली. मात्र, अजुनही केवळ तातडीची प्रकरणे सुनावणीसाठी घेतली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील बाररूम बंद ठेवायच्या आहेत.तसेच कोर्टरूममध्येही बसण्यासाठी अथवाउभे राहण्यास परवागनी नाही. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत न्यायालयाचे कामकाज चालल्यास इतका वेळ कुठे थांबायचे असा प्रश्न बार असोशिएशनने विचारला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायाधिशांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.१६ जून रोजी लागणार निर्णयसर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच बाररूम बंद आहेत. कामकाज सुरू होऊनही बाररूम बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा न्यायालय परिसरात विशेष खबरदारी घेतल्या जात आहे. त्यासाठी बार असोसिएशन देखील विशेष लक्ष देत आहे. बाररूम समस्येबाबत १६ जून २०२० रोजी उच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याने त्याकडे आमचे लक्ष आहे, अशी माहिती चंद्रपूर बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद आंबटकर यांनी ‘लोकमत’ला दिली.वकीलच न्यायालयाबाहेर ताटकळतराजुरा : न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात सुरू झाले. मात्र, बाररूम बंद असल्याने वकिलांना न्यायालयाबाहेर उन्हात बसावे लागत आहे. वकिलांना बसण्याची दुसरी कुठेही व्यवस्था नसल्याने ताटकळत राहावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गैरसोय वाढ ूशकते. बार रूममध्ये काही ज्येष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यास तयार आहोत. मात्र, बाररूम खुली करण्याची मागणी राजुरा तालुका तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण धोटे, सचिव अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, अ‍ॅड. निनाद येरणे, अ‍ॅड. मुरलीधर देवाडकर, अ‍ॅड. आसिफ कुरेशी, अ‍ॅड. मंगेश बोबाटे, अ‍ॅड. विजय पुणेकर यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालय