शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या निवाड्यासाठी जिल्हा कृषी प्राधिकरण स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:32 IST

Agriculture Authority Chandrapur news राज्यातील शेतीसंदर्भातील वादविवादांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रारूप समितीकडून आराखडा तयारहिवाळी अधिवेशनात अहवाल सादर होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील शेतीसंदर्भातील वादविवादांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप समितीची गठित झाली. ही समिती येत्या १५ दिवसात आपला अहवाल नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाला सादर करण्याची शक्यता आहे.

खरीप व रब्बी हंगामादरम्यान निकृष्ट व सदोष बियाणे, निकृष्ट खते, किटकनाशके, पीक विमाच्या अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात. अशा प्रकरणांचा वर्षानुवर्ष निकाल लागत नाही. त्यामुळे भरपाई मिळण्याची शक्यता कमीच असते. या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना कृषी प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर दाद मागण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संविधानातील ३२३ बी (२) (जी) या तरतुदीचा वापर करून राज्यस्तरावर कृषी विषयक अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार राज्यांना आहेत. भारतीय घटनेने दिलेल्या याच अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच प्राधिकरणासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या प्रक्रियेला गती आली आहे. जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरणाकरिता लागणारे मनुष्यबळ, निधीची तरतूद याबाबतही समिती आपल्या अहवालात उल्लेख करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत या आराखड्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली.किसान काँग्रेसने दिला होता प्रस्तावया संदर्भातील प्रस्ताव किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी सादर केला होता. त्या प्रस्तावावर आधारित ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. कृषी प्राधिकरणाकडून होणाºया निवड्यासंदर्भातील आराखडा तयार झाला आहे. त्यावर विधी व न्याय विभागाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अ‍ॅड. अजय तल्हार, अ‍ॅड. शिरीश हिरे, संजय लाखे पाटील व देवानंद पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती