शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाच्या ‘शोध नाविन्याचा’ स्पर्धेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:53 IST

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविन्याचा’ या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. यासाठी कल्पक संकल्पना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्याचे आवाहन : नागरिकांनी कल्पक संकल्पना पाठवाव्या

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविन्याचा’ या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. यासाठी कल्पक संकल्पना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.शेती, उपजिवीका विकास, पर्यटन विकास व प्रशासन प्रक्रियेतील सुधारणा संदर्भात नागरिकांच्या भन्नाट आयडीया ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाने मागितल्या आहेत. आॅफलाईन, आॅनलाईन पद्धतीने या स्पर्धेत सहभागी होता येणार असून सेतू केंद्र ते ग्रामपंचायत येथे या संदर्भातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाºया नागरिकांकडे अनेक कल्पकता असते. काही प्रयोग त्यांनी स्वत:च्या अनुभवातून सिध्द केले असतात. तर अनेकांना आपल्याकडे सत्ता, प्रशासकीय अधिकार असते तर, असे बदल केले असते, एका दिवसात सगळं बदलून टाकलं असतं, अशी महत्त्वाकांक्षा असते. अशा स्वानुभवातून केलेल्या प्रयोगांना किंवा अफलातून सूचनांना थेट प्रशासनात अंमलात आणण्याचे धाडस जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दाखविले ‘हॅलो चांदा’ नंतर एका नव्या संकल्पाच्या उत्सवाला जिल्हयात सुरुवात झाली आहे. यासाठी १ लाख २ हजार रुपयांच्या रोख पुरस्काराचे नियोजन असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी हॅलो चांदा १८००-२६६-४४०१ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती घेता येणार आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात फिरण्यासाठी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी हिरवी झेंडी दाखवली.कुणीही करू शकणार अर्जया स्पर्धेमध्ये १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती, समूह, संस्था अर्ज करु शकणार आहे. शेती संदर्भात आयडीया देताना जमिनीची उत्पादकता, शेतीसोबत पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, एकापेक्षा अधिक पीक घेण्याबाबत, लागवड खर्च कमी करणे, भाज्या आणि फळ उत्पादन माहितीचा समावेश आहे.