शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी केले झाडांचे वितरण

By admin | Updated: January 18, 2017 00:43 IST

‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या दोन कोटी वृक्ष लागवडीला..

१३० झाडांचे वितरण : मार्कंडेय महिला मंडळाचा उपक्रमसावली : ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या दोन कोटी वृक्ष लागवडीला साथ देण्याच्या उद्देशाने मार्कंडेय महिला मंडळाने मकरसंक्रातीच्या निमित्याने वाणामध्ये १३० विविध प्रजातीच्या झाडांचे वितरण केले. सदर उपक्रम राबविल्याबद्दल मार्कंडेय महिला मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मकरसंक्रातीच्या निमित्याने ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत सर्व महिला एकत्र येऊन ‘वान’ च्या रुपात विविध वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. अनेक वर्षापासून सर्वत्र हि प्रथा सुरु आहे. यामध्ये महिलाही मोठ्या आनंदाने ही प्रथा पार पाडत असतात. मात्र सावली येथील मार्कन्डेय महिला मंडळा अध्यक्षा अर्चणा अंगडीवार, आरजू बोम्मावार, अविशा आडेपवार, माया बोम्मावार, मंदा तुम्मेवार, कविता चामलवार, गायत्री तुम्मे, रजनी तुम्मे, सुमन बगळे, शोभा मुंराडे, प्रणिती नन्नेवार, रिया पाल यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सदर परंपरेला फाटा देत विविध प्रजातीच्या वृक्षाचे वितरण करण्याचा संकल्प केला. तसेच सदर झाडांची योग्य प्रकारे निगा राखण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरावरुन कौतूक करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)येजगाव येथे मडकी वाटपमूल : तालुक्यातील येजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव लेनगुरे यांनी मागील अनेक वर्षापासून तीळसंक्रातनिमित्य गावातील सर्व स्त्रियांंना वाणाच्या स्वरुपात मातीचे मडके वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला. नामदेव लेनगुरे हे गावातील सर्व स्त्रियांना मकरसंक्रातीच्या दिवशी एकत्र करुन तीळगूळ घ्या, आणि गोड गोड बोला’, असे सांगत त्यांना थंड पाण्याच्या माठांचे वितरण करतात. त्यानुसार रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करुन माठांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मंजुळा चलाख यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जीवनबाई देवतळे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मालता वाढई, बबिता वाढई, वर्षा मोहुर्ले, सुनिता लेनगुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव लेनगुरे, साईनाथ लेनगुरे आदींनी प्रयत्न केले. यावेळी व्यसन सोडणाऱ्या विद्या वाढई, सुनिता शेंडे, जीवनकला रेवते, वर्षा मोहुर्ले, सोनी धांडरे, मीना वाढई यांचा सत्कार केला.