उलगुलान संघटना व बौध्द विकास मंडळाचे उपक्रम
मूल : येथील बौध्द विकास मंडळ व उलगुलान संघटनेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने नुकतेच विहीरगाव आणि सोमनाथ प्रकल्प येथे नोटबुक आणि दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाला बौध्द विकास मंडळाचे अध्यक्ष शमिकांत डोर्लीकर, उलगुलान संघटना शाखा मूलचे अध्यक्ष निखील वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल ,आकाश येसनकर उपस्थित होते.
शिक्षणाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य महात्मा फुले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाचे दार उघडले. असंख्य हाल-अपेष्टा सहन करून शिक्षणाचे महत्त्व या दोन्ही दाम्पत्यांनी पटवून दिले. त्यांच्यामुळेच आज महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. अशा या महान महामानवांच्या विचारांना प्रेरणा मिळावी, तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत म्हणून उलगुलान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व बौध्द विकास मंडळाने नोटबुक वितरणाचा उपक्रम मूल शहरात राबवला.
संचालन प्रणय रायपुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार चेतन दहिवले यांनी मानले. यावेळी रोहित शेंडे, हर्षल भुरसे, वतन चिकाटे, साहील खोब्रागडे, सौरव वाढई, सुधीर वाडगुरे, साहील मेश्राम, सुरज गेडाम, निहाल गेडाम, नीरज डोर्लीकर, अजय दहिवले, राकेश मोहूर्ले उपस्थित होते.