शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा मिठाई वाटून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:10 IST

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ व वाढती महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पुष्पगुच्छ, तिलक, मिठाई वाटप करून गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी : अनोखे आंदोलनातून वाढत्या महागाईचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ व वाढती महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पुष्पगुच्छ, तिलक, मिठाई वाटप करून गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडले आहे. तसेच देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे या महागाईमुळे कठीण झाले आहे. एवढे मोठे पेट्रोल, डिझेल भाव वाढविण्याचे कटकारस्थान भारतीय जनता पार्टीने केले आहे. याचा विरोध बीआरएसपीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर आंदोलन बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, युवा नेते इंजि. मोनल भडके यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा परिषद समोरील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यावेळी राजू झोडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहे. वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. सरकारच्या मनमानी व हुकूमशाही धोरणामुळे सध्या सामान्य जनता भयभीत झाली आहे. अच्छे दिनाचे गाजर दाखवून या सरकारने सत्ता हस्तगत केली. आणि आता जनतेची लूट सुरू केली आहे. दिलेले आश्वासन शासनाने पाळले नाही. देशात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरूच आहे. त्यामुळे आता या सरकारला जनताच धडा शिकविणार असल्याचेही झोडे यांनी सांगितले. इंधन आणि गॅस दरवाढ तत्काळ कमी न झाल्यास बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विदर्भात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही राजू झोडे यांनी सरकारला दिला आहे.यावळी इंजि. मोनल भडके, संजय मगर, राजू रामटेके, गुरु भगत, अजय पागडे, महेंद्र झाडे, अनुकूल शेंडे, संपत कोरडे, सुधीर गेडाम, शक्ती इंगोले, अनीश मानकर, शैलेश बारसागडे तसेच बीआरएसपीच्या कार्यकर्र्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.