शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण

By admin | Updated: November 8, 2015 01:16 IST

दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे.

चंद्रपूर : दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे. भारतीय खाद्य निगमने पाठवलेला हा गहू परत न पाठवता तो जशाच्या तशा लोकांना वाटला जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा संपात व्यक्त होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमध्ये जे धान्य वितरित केले जाते. त्याचा पुरवठा भारतीय खाद्य निगमद्वारे केला जातो. रेल्वेने हा माल चंद्रपुरात पाठवला जातो. नंतर तो वखार महामंडळाच्या गोदामामध्ये वाळवून नंतर त्याचा पुरवठा अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानात केला जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हा निकृष्ट गहू येथील गोदामांमध्ये आला. तेव्हाच तो निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे अडीचशे पोते हा गहू होता. गुरेसुद्धा खाऊ शकणार नाही, इतका त्याचा दर्जा सुमार आहे. आधी हा गहू परत पाठवू, असे म्हणणारा पुरवठा विभाग नंतर कसा राजी झाला, हेच कळायला मार्ग नाही. याआधी याची वाच्यता माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने फूड कॉर्पो रेशन इंडियाला पत्र पाठवून गव्हाची उचल करणार नाही, असे पत्र पाठवले. पण, आता तोच गहू गोरगरीबांना वाटला जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सणासुदीच्या दिवसात असा निकृष्ट गहू गोरगरिबांच्या माथी मारुन त्याची थट्टा केली जात आहे. पर्याय नसल्यामुळे तो घ्यावा लागतो, अशी अगतिकता लोकांनी व्यक्त केली. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची काहीही चुकी नाही. त्यांना जसा पुरवठा झाला, तसा ते वाटप करीत आहेत. तांदूळ आणि साखर चांगली आहे. पण गहू खराब असल्याने रेशन दुकानदारही चिंतीत आहेत. पण, त्यांचाही नाईलाज आहे. लोकांंना तो वाटण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना राबवून, त्यांच्याच मतांवर निवडून येऊन, त्यांचीच अशी गती केली जात असेल, तर मायबाप सरकार कोणत्या कामाचे, असा प्रश्न आता हे गोरगरीब करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)