शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण

By admin | Updated: January 3, 2017 00:44 IST

ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना चूल व धूरमुक्त जीवन सन्मानाने जगता यावे, ...

हंसराज अहीर : नववर्षानिमित्त चंदनखेडा येथे कार्यक्रम चंद्रपूर : ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना चूल व धूरमुक्त जीवन सन्मानाने जगता यावे, त्यांचे स्वास्थ्यविषयक सशक्तीकरण व्हावे, या उदात्त विचारांनी प्रेरित होवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना कार्यान्वित केली. त्यानूसार देशभरात अल्पावधीतच मोफत गॅस योजनेचा लाभ सुमारे दीड कोटी महिलांना उपलब्ध करुन या योजनेस ऐतिहासीक स्वरूप प्राप्त करण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. त्यानूसार सांसद आदर्श ग्राम चंदनखेड्यात ६३ महिला लाभार्र्र्र्थींंना मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करताना आनंदाबरोबरच आत्मिक समाधान लाभले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील कर्मवीर सभागृहात नववर्षाच्या पर्वावर रविवारी आयोजित मोफत गॅस वितरण कार्यक्रमास उपस्थितांना संबोधीत करताना ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, अनिल फुलझेले, डॉ. अनिल बुजोने, राहूल सराफ पं.स. सभापती इंदू नन्नावरे, चंदनखेड्याचे सरपंच भाग्यश्री बागेसर, नरेंद्र जीवतोडे, विठ्ठल हनवते, उपसरपंच मारोती गायकवाड, सोनकुसरे, विठ्ठल कापकर, विकास खटी, डेविड बागेसर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, भारत गॅसचे चोपने, मनोहर नन्नावरे, संजय देवतळे, पंढरी चौधरी, गुलाब भरडे, चंद्रकला दोडके आदीं उपस्थित होते. यावेळी ना. अहीर व उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर व साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ना. अहीर म्हणाले, अनेक वर्षे ग्रामीण भागातील माता भगिनी चुलीच्या धुराने त्रस्त होत्या. धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवून विविध आजाराने त्यांचे स्वास्थ धोक्यात आले होते. पंतप्रधानानी या महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना आरोग्य संपन्न व सुविधाजनक जीवन जगता यावे यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु करुन दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरिता मोफत गॅस उपलब्ध करुन त्यांना धुरापासून मुक्ती मिळवून दिली हे कार्य महान आहे. चंद्रपूर- वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रात हजारो महिलांना आजपर्यंत या योजनेद्वारा गॅस वितरण करण्याची संधी लाभली ही अत्यंत समाधानाची बाब असून यापुढेही या योजनेच्या माधमातून क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वितरण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली. यावेळी उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी समयोचित विचार व्यक्त केले. आयोजक अधिकाऱ्यांनी या योजनेची पार्श्वभूमी व भविष्यातील फायदे यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास लाभार्थी महिला व गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. यावेळी मधूमक्षीका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल मध देवून ना. अहीर यांचा सन्मान करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (नगर प्रतिनिधी)