शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आपादग्रस्तांना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:14 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी घोडपेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देआपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी घोडपेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.घोडपेठ येथील प्रविण वासुदेव झाडे (२२) या युवकाचा शेतात फवारणी करून परत येत असतांना विज पडून मृत्यू झाला होता. प्रविणचे वडिल वासुदेव झाडे आणि मदनाताई यांना नामदार हंसराज अहीर यांच्या हस्ते शासकिय मदत म्हणून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.तसेच चालबर्डी (रै.) येथील गुलाब किसन जांभुळकर यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला होता. त्यामुळे ऐन हंगामात या शेतकºयावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. याप्रसंगी गुलाब जांभूळकर यांनासुध्दा शासकिय मदत म्हणून २५ हजारांचा धनादेश देण्यात आला.याप्रसंगी जि.प. सदस्य यशवंत वाघ यांनी आपल्या मनोगतातून शेतीपुरक व्यवसाय करावा, व शेतीसोबतच जोडधंदा करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी, असे आवाहन केले.यावेळी जि.प. सदस्य यशवंत वाघ, राजू गायकवाड, विश्वास निमकर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, नायब तहसीलदार मधूकर काळे, विवेक सुरावार, उपसरपंच विनोद घुगूल, ग्रा.पं. सदस्य गिरीश माहुलकर, अनिता देवगडे, परेश मैदमवार, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, संदीप बोकारे, केशव लांजेकर, सुनिल नामोजवार, नागो निमकर, शामराव नांदे, सुधाकर येसेकर, रमेश जोगी, अनिल खडके, विजय सातपूते, गणपत साव आदी उपस्थित होते.