शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

महाराजस्व अभियानात विविध २३ हजार दाखल्यांचे वाटप

By admin | Updated: November 8, 2015 01:20 IST

शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते.

चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते. तेच कामकाज जलदगतीने करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाला मिळणारा प्रतिसाद व फलश्रुती विचारात घेऊन सदर अभियान नेहमीसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात या वर्षात वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर व उत्पन्नाचे दाखले असे विविध २३ हजार १९४ दाखले वाटप करण्यात आले. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले असून फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढले तर एक हजार ६० गावात चावडी वाचनातून जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या.या अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या दूर झाल्या नसतील किंवा त्यांची वेळेवर कामे पूर्ण होत नसतील तर नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार करण्याचीसुद्धा गरज भासत नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी ९९७०००१३१२ हा क्रमांक सुरू केलेला असून यावर एसएमएस करण्यासाठी कुठलाही कालावधी दिलेला नाही. त्यामुळे नागरिक केव्हाही आणि कुठूनही घरबसल्या एसएमएस करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच या कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती दिवसात कोणते कागदपत्रे जोडल्यास मिळतात, याची माहिती देण्यासाठी १८००३०००८८९८ हा टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे.विविध दाखले देण्याकरिता शिबिरे आयोजित करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते, शिवाररस्ते मोकळे करणे. एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे त्याकरिता मंडळ मुख्यालयी फरफार अदालत घेणे. चावडी वाचन, आदिवासी जमीनधारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे, आदिवासी जमिनी परत करण्याची मोहीम हाती घेणे इत्यादी कामे या अभियानात करण्यात येतात. समाधान योजनेंतर्गत महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येते. कमी जास्त पत्रकाच्या आधारे जमीन अभिलेख अद्ययावत करण्याचे कामही या अभियानात केल्या जाते. विद्यार्थी व नागरिकांना लागणारे सर्व दाखले मिळविणे आता सोपे झाले असून दाखल्यासाठी होणारी पायपीट महाराजस्व अभियानामुळे बंद झाली आहे.महसूल प्रशासनातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात २८० शिबिर घेऊन विविध २३ हजार १९४ दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमति रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढण्यात आले असून १ हजार ६० गावात चावडी वाचनातून समस्या सोडविण्यात आल्या. तलाठी कार्यालयात जाण्याचा नाही त्रास, मंडळ मुख्यालयी फेरफार करा हमखास यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्यात येते. या अभियानामुळे नागरिकांना विविध सेवा तत्काळ मिळण्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)