शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. शाळांना द्यावा लागणार २० वर्षांतील खर्चाचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST

समग्र शिक्षा, सर्व शिक्षा व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील सर्व योजनांसाठी केंद्र शासनाकडून राज्याला कोट्यवधींचा निधी देण्यात आला. मात्र, ...

समग्र शिक्षा, सर्व शिक्षा व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील सर्व योजनांसाठी केंद्र शासनाकडून राज्याला कोट्यवधींचा निधी देण्यात आला. मात्र, या निधीचे समायोजनच झाले नाही. परिणामी, लेखापरीक्षण अहवालात मोठ्या प्रमाणात अग्रीम रक्कम शिल्लक आहे. या शिल्लक रकमेबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारकडे तीव्र नाराजी दर्शविली. या रकमेचे समायोजन करून अग्रीम रक्कम शून्य केल्याशिवाय पुढील निधी वितरित केला जाणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व मेसर्स व्ही. बी. शर्मा अँड कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्य शासनाने आदेश जारी करताच शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) गुरुवारी ९ सप्टेंबर २०२१ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी तत्काळ निर्देश जारी केले. अधीनस्थ कार्यरत रोखपाल व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना २१ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

बॉक्स

अशा आहेत अटी

२००२ ते २०२०-२१ पर्यंत सर्व जि. प. शाळांचे वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे., तालुकानिहाय प्रपत्रात एमआरपी व अखर्चित निधीही धनादेशाद्वारे परत करावा लागणार आहे. बीआरसी, सीआरसी, एसएमसीचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र येथे उघडून अहवाल सादर करणे, सर्व शाळांचे वर्षनिहाय खर्चाचे देयक सादर करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बॉक्स

मुख्याध्यापक धास्तावले

समग्र शिक्षाअंतर्गतची सर्व माहिती पंचायत समितीस्तरावरून गटशिक्षणाधिकारी हे अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून गोळा करणार आहेत. मात्र, या माहितीसाठी मुख्याध्यापकांचे अहवाल महत्त्वपूर्ण आहेत. २० वर्षांच्या कालावधीत अनेक मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या. अशा परिस्थिती पंचायत समितीकडून या विषयाशी संबंधित कोणतीही माहिती मागितली जाऊ शकते. त्यामुळे जि. प. शाळांचे मुख्याध्यापकही धास्तावले आहेत.