शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन धान्य वितरण बाधित

By admin | Updated: May 20, 2017 01:13 IST

मार्च महिन्यात पैसे भरूनही भारतीय दूरसंचार निगमने ब्रॉडबँड सेवा उपलब्ध केली नाही.

ब्रॉडबॅन्ड सेवा : मूल, सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्ण्यात प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मार्च महिन्यात पैसे भरूनही भारतीय दूरसंचार निगमने ब्रॉडबँड सेवा उपलब्ध केली नाही. ब्रॉडबँडअभावी मूल, सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, जिवती व पोंभुर्णा तालुक्यातील आनलाईन धान्य वितरण बाधित झाले आहे. ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी शिधापत्रिकाधारकांचे अहवाल अद्ययावत करणे व आधार कार्ड लिंकिंग रखडले आहे. जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक्स सार्वजनिक पुरवठा योजनेच्या (इपीडीएस) माध्यमातून धान्य वितरण केले जाते. त्याकरिता शिधापत्रिकांचे आधार लिंकिंग करून या शिधापत्रिकांमध्ये दुरूस्ती करण्यात आल्या आहेत. डाटा एन्ट्री करताना कुटुंबातील सदस्य, स्वयंपाकाचा एलपीजी गॅस, युुनिट पूर्ण करणे आदी कामे करण्यात आले आहेत. ही सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. कोणताही शिधापत्रिकाधारक आपली माहिती पुरवठा विभागाच्या वेबसाईट पाहू शकतो. आता जिल्ह्यातील १ हजार ५२४ स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९६५ मशीनवर धान्य वितरण सुरू झाले आहे. पुरवठा विभागाने आपली सर्व यंत्रणा आॅनलाईन केली आहे. शिधापत्रिकांचा माहिती अद्ययावत करण्यात आल्यावर त्याच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. त्याकरिता सर्व तालुकास्तरावरील कार्यालयांमध्ये आयटी केंद्र स्थापन करून ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून शिधापत्रिकांमध्ये दुरूस्त्या करण्यात येत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने मार्च महिन्यात इतर तालुक्यांप्रमाणे मूल, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, जिवती व पोंभुर्णा तालुक्यांकरिता बीएसएनएल कार्यालयात ब्रॉडबँड सेवा घेण्यासाठी पैशांचा भरणा केला. परंतु या तालुक्यांमध्ये अद्यापपर्यंत ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्यात आलेली नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांनी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधून ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्याची मागणी केली. या सेवेशिवाय रेशनकार्ड दुरूस्तीची कामे व आधार कार्ड लिंकिंग करणे शक्य नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्किन यांनी बीएसएनएल कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे.