शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्हा रुग्णालयाला घाणीचा संसर्ग

By admin | Updated: July 20, 2015 00:43 IST

केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा संसर्ग झाला आहे.

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर) केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा संसर्ग झाला आहे. या रुग्णालयाची सध्या रंगरंगोटी सुरू असली तरी चहुबाजुने हा परिसर घाणीने बरबटला आहे. दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हैराण आहेत. औद्योगिकदृष्ट्या विस्तारत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. उद्योग असल्याने प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सोबतच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दळण-वळण असल्याने अपघातही घडत असतात. विविध आजाराने ग्रस्त रुग्ण तसेच अपघातातील जखमींना सर्वप्रथम उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. मात्र या रुग्णालयात पोहचल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना घाणीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीची तिव्रता अधिकच आहे. रुग्णालयातील गटरलाईन ठिकठिकाणी फुटून असल्याने त्यातील घाण पाणी परिसरात साचून आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यतादेखील निर्माण झाली आहे. आजार दूर करणारे रुग्णालयच यामुळे आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या घाणीने तुंबल्या असून त्याच्या नियमित स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. ठिकठिकाणी झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर या परिसरात आहे. रुग्णांच्या वॉर्डाबाहेरच गटरचे पाणी साचले असून त्यामुळे रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांनादेखील अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. सध्या या रुग्णालयाच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मात्र परिसर घाणीच्या विळख्यात आहे. विशेष म्हणजे लहान मुले व गरोदर महिलांसाठी असलेल्या वॉर्डाच्या बाहेर मागील बाजुची गटरची पाईप लाईन फुटली असल्याने या वॉर्डामधे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अशा परिस्थितीत या चिमुकल्यांवर उपचार केले जात आहेत. याचा विपरित परिणाम आरोग्यवर होण्याची शक्यता आहे.अनेकदा तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातलगांकडून केला जात आहे. रुग्णालयाचा परिसर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. प्रसाधनगृहाचा वापर दारु पिण्यासाठीजिल्ह्या सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातलगांसाठी मूत्रीघराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे मूत्रीघर अतिशय घाण झाले असून त्याची साफसफाई कधीच केली जात नाही. तेथे पाण्याचीही सोय नाही. दरवाजे नाहीत. आता या मुत्रीघरामधे दारुच्या बॉटला आणि प्लॉस्टीकचे ग्लास सर्वत्र पसरलेले दिसून येतात. हवेसाठी घरचा पंखा दरवर्षी लाखो रुपयांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयावर खर्च केला जातो. तरीही अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या रुग्णालयात पंख्याचीही मोठी समस्या आहे. येथे लावण्यात आलेले पंखे हे जुने असून काही पंखे बंद अवस्थेत आहेत. ते सुरू करण्याचे सौजन्य प्रशासनाकडून दाखविले जात नाही. पंखा फक्त दिसायलाच फिरतो. वेग नसल्याने त्यातून रुग्णांना हवा लागत नाही. त्यामुळे काही रुग्णांच्या नातलगांनी आपआपल्या घरुन पंखे आणून तेथे लावले आहेत. रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे नेहमीच लक्ष दिले जाते. सोमवारी मी स्वत: परिसराची पाहणी करून व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. गटर लाईनच्या पाईप नादुरूस्त असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.- पी.एम.मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर