शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

बदलून जाताना काढलेली पाच कोटींची देयके चर्चेत

By admin | Updated: June 22, 2016 01:14 IST

महानगर पालिकेतील स्थानिक नेत्यांशी उडणारे खटके आणि स्वत:च्या कार्यप्रणालीमुळे नेहमी वादग्रस्त ठरलेले महानगर पालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर ...

मनपा आयुक्तांवर आरोप : तीन महिन्यांपासून अडल्या होत्या फाईलचंद्रपूर : महानगर पालिकेतील स्थानिक नेत्यांशी उडणारे खटके आणि स्वत:च्या कार्यप्रणालीमुळे नेहमी वादग्रस्त ठरलेले महानगर पालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर जाता जाता पुन्हा नवा वाद छेडून गेले आहेत. चंद्रपूरचा पदभार सोडता सोडता येथील कंत्राटदारांच्या ५ कोटी ५ लाख ९१ हजार ५५ रूपयांच्या देयकांना मंजुरी देण्याच्या आणि संबंधित कंत्राटदारांना तातडीने धनादेशांचे वितरण करण्याच्या त्यांच्या तत्परतेने विरोधकांना आरोपासाठी आयतीच संधी दिली आहे.चंद्रपूर महानगर पालिकेमध्ये सुरू असलेल्या विकास कामांवरून आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून वितुष्ट आले होते. त्याची परिणती दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप होण्यात झाली होती. याच काळात २०१३ मध्ये झालेल्या चंद्रपूर पंचशताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमधील आर्थिक अनियमितेची चौकशीही एसीबीकडून सुरू असल्याने आणि एक कंत्राट पास करण्यासाठी काही नगरसेवकांनी कथितरीत्या ४२ लाख रूपयांची मागणी केल्याच्या प्रकरणाने या वादात अधिकच भर पडली होती. हे सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या बदलीसाठी जोरदार हालचालीही नाराज गटाने सुरु केल्या होत्या. मात्र एका आमदाराचा त्यांना आशीर्वाद असल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या उचलबांगडीसाठी अडथळे येत होते. दरम्यानल मनपातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मुंबई वारीनंतर दोन आठवड्यातच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले, यामुळे आयुक्त विरोधकांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अचानक निघालेल्या बदलीच्या आदेशानंतर आयुक्त शंभरकर यांनी मागील दोन ते तीन महिन्यांपासून स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत असलेल्या देयकांवर स्वाक्षरी करून १७ व १८ जूनला धनादेशही वितरित केले. ही माहिती बाहेर आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)या कंत्राटदारांना दिले धनादेश१७ जूनला मोहन नामनवार - ११ लाख ४० हजार ४६ रुपये , रामा इन्फ्रा.- ४ लाख ६१ हजार १४१ रु, महेश कन्ट्रक्शन- ७ लाख २९ हजार ५२४, ४ लाख ३४ हजार ४३२ आणि ३ लाख ७२ हजार ८२९ रु, के.एम. घुमडे- ११ लाख ५९ हजार २० रू आणि ८७ हजार ९१० रु., रविन्द्र चहारे- ९ लाख ९५ हजार ३५४ रु., एस.बी. शाहा- ८ लाख ८०९ रु,एस.वी.एम. कन्ट्र.- ४२ लाख ८६ हजार ४०१ रु, मनोज खत्री- २८ लाख ७४ हजार ४८७ रु., एन.सी. भंडारी- १० लाख ३० हजार ४७१ रु, वी.जी. चहारे- २४ लाख ७ हजार ४२० रु, राजीव सिंग- १५ लाख ४३ हजार ५४७ रु, मेकव्हिल कन्ट्र. - ५ लाख ७१ हजार ५०९ रु, निलम मुस्ताक शेख- १४ लाख ७० हजार ५ रु., भाग्यलक्ष्मी कन्ट्रक्शन- २० लाख ४ हजार ९७३ रु, बालाजी एसो.- ८४ लाख १३ हजार ५६० रु, कोर प्रोजेक्ट- १२ लाख ८३ हजार ८०० रु, आधुनिक इलेक्ट्रीकल- ३६ लाख ३६ हजार ८३७ रु, एन.एस. कन्ट्र.- ४४ लाख ४ हजार ७५७ रु, शिवा स्वाती कंन्ट्र- २० लाख ९६ हजार १६९ रु, रंजना घाट- १० लाख ३० हजार ९०३ रु.१८ जूनला महेश कन्ट्रक्शन- २९ हजार, १० लाख ३०४ रू आणि ७ लाख ४९ हजार ९०५ रु, भाग्यलक्ष्मी कन्ट्रक्शन- ५४ लाख १२ हजार १४४ रु, महेश बोडके- ३ लाख ५८ हजार ३४४ रु, रमेश चहारे- ३ लाख ३९ हजार ३७८ रु, मेकव्हिल कन्स्ट्र. - ३ लाख ५५ हजार ५७६ रुपयांच्या रकमेचे धनादेश देण्यात आले.