शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह धरणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Updated: November 26, 2015 00:53 IST

गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना ...

रामदास आठवले : शिष्टमंडळाला आश्वासनचंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोर येथून जवळच असलेल्या बोंडगाव देवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना इडियाडोह धरणाचे पाणी पुणविण्यात यावे या मागणीसाठी शिष्टमंडळाने आरपीआय (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या निवासस्थानी भेटून देऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाची निर्मिती सन १९६५ साली करण्यात आली. १९७३ पासून धरणाचे पाणी शेतीसाठी सुरू करण्यात आले. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौ.मी. असून क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर एवढी आहे. सदर धरणाचे पाणी अर्जूनी मोर पासून ते गडचिरोली जिल्ह्यात ८० ते ९० किमीचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु धरणापासून जवळच असलेल्या अर्जूनी/मोर तालुक्यातील बोंडगाव देवी परिसरातील १५ ते २० खेडेगावांना धरणाच्या पाण्यापासून मागील ३० वर्षांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.खा. रामदास आठवले यांना शिष्टमंडळाने निवेदन मागणी केली यावेळी व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके, उपसरपंच माधोराव झोळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजू ठवरे, सुभाष रामटेके, संजय बुटले, कमलेश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. गावाच्या पाणी प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करु असे रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)