शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांशी चर्चा, टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात राजनांदगाव- वरोरा ट्रान्सफार्म कंपनीने अनेकांच्या शेतात टॉवर उभे करणे सुरू केले होते. शेतकऱ्यांना अनियमित मोबदला देवून अन्याय केला होता. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी व आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला दोन महिने तेरा दिवस लोटल्यानंतर उपोषण मंडपाला शासकीय अधिकाऱ्यांनी ...

ठळक मुद्देन्याय मिळणार : दोन महिने १३ दिवसानंतर आंदोलनाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात राजनांदगाव- वरोरा ट्रान्सफार्म कंपनीने अनेकांच्या शेतात टॉवर उभे करणे सुरू केले होते. शेतकऱ्यांना अनियमित मोबदला देवून अन्याय केला होता. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी व आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला दोन महिने तेरा दिवस लोटल्यानंतर उपोषण मंडपाला शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली व शेतकºयांशी चर्चा केली. त्यामुळे बुधवारी दीड वाजता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे उपोषण सुटले.टॉवर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीची मोजणी होईपर्यत टॉवरचे काम बंद करण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम पूर्ण झाले अशा शेतकºयांना मोबदला द्यावा, प्रत्येक शेतकºयांना २५ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शासन परिपत्रक ३१ मे २०१७ च्या परिपत्रकातील नियमांचा भंग केल्याने कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, मोजणीचे पैसे भरूनही मोजणी न केल्यामुळे महसूल बुडविणाºया कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, उभ्या पिकाचे नुकसान करणाºया कंपनीवर गुन्हे दाखल करावे, आदी मागण्यांसाठी शेतकºयांनी उपोषणाला सुरूवात केली होते.या सर्व मागण्यांवर उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार संजय नागटिळक यांनी शेतकºयांशी चर्चा केली व रेडीरेकनरच्या दराने कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार याची माहिती दिली. त्यामुळे शेतकºयांनी उपोषण सोडले. यावेळी टॉवरग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन सोनटक्के उपोषणकर्ते अन्ना डोये, आनंदराव केमये, वसंत चंदेलकर, रामभाऊ कोलते, अमृत ननावरे, संदीप नागोसे, अमोल देठे, शामराव गायकी, प्रभु गेडाम, तातोबा चट्टे, गोठे आदी उपस्थित होते.टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे विलास डांगे यांनी उपोषणग्रस्त शेतकऱ्यांना व प्रशासनाला चुकीची माहिती देवून उपोषण लांबविले. त्यामुळे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला व प्रशासनात शेतकऱ्यांविषयी गैरसमज निर्माण झाला होता. मात्र चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला.- हरिष धार्मिकउपविभागीय अधिकारी, चिमूर.