शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बांबूला वाहतूक परवान्यातून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:30 IST

बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बुरुड समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. सन २०१७ च्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबु प्रवण क्षेत्रात ४४६५ चौ.कि.मी. इतकी भरीव वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. बांबु क्षेत्राचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र महाराष्ट्र बांबु विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बांबुच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला आपण प्राधान्य दिले असून बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट आपण स्थापन केले आहेत. बांबुला वाहतूक परवान्यातून सूट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हा निर्णय आता देश पातळीवरसुध्दा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, वनेमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपुरात विदर्भ बुरूड समाज संघटनेद्वारे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बांबु धोरणाअंतर्गत बुरूड समाज बांधवांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण लवकरच एक बैठक घेवून योग्य दिशा निश्चित करू. बुरूड समाज नेहमीच सात्विक आणि प्रामाणिक राहिला आहे. बांबुच्या माध्यमातून उपजिविका करणाऱ्या या समाजाने नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. नविन बुरुडांना वन विभागाकडे नोंदणी करण्यास मान्यता देत बुरुड समाजातील बांबू कारागीरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या बांबुवरील स्वामित्वशुल्कात सूट प्रदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बांबुपासून रोजगार निर्मितीच्या शासनाच्या धोरणाला अनुसरून बुरूड समाज बांधवांना योग्य प्रशिक्षण देण्यास शासन तयार आहे. त्या दृष्टीने समाज बांधवांनी आपली मानसिकता तयार करण्याची आवश्यकता आहे. बुरूड समाज बांधवांनी या दृष्टीने त्यांच्या संकल्पना सादर कराव्या, शासन पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.यावेळी आ. नाना श्यामकुळे म्हणाले, राज्य शासनाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बांबु क्षेत्रासाठी अभुतपूर्व असे निर्णय घेतले आहे. सामाजिक जाणीव लाभलेला असा नेता पाठिशी असताना बुरूड समाज बांधवांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे सांगितले. यावेळी बुरूड समाजाचे नेते किशोर जोरगेवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आ. प्रा. अनिल सोले, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार, व्यंकट रामलू, कैलाश पदमगिरीवार, स्वाती वडपल्लीवार, अनुराधा पल्लडवार, बंडू गैनेवार, दिपांजली मंथनवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.