शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त केल्यास नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:04 IST

देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.

ठळक मुद्देप्राध्यापकांची शैक्षणिक धोरणांविषयी नाराजी : एफ. ई. गर्ल्स कॉलेजमध्ये सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील उच्च शिक्षणात मूलभूत भूमिका बजावणारी घटनात्मक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करून नवीन व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राचे हित लक्षात न घेता असे निर्णय घेणे चुकीचे असून यातून समग्र शिक्षण क्षेत्राचेच मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, अशी नाराजी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केली.अध्यक्षस्थानीचे नुटाचे माजी सचिव अनिल ढगे तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक नुटा व एम. फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. नितिन कोंगरे, सहसचिव डॉ. अजित चाजक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, उपस्थित होते. महाराष्टÑ प्राध्यापक महासंघाने प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, उच्च शिक्षणात शिक्षकांची भरती करावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची पिळवणूक थांबवावी. विद्यापीठ अनुदानसारख्या घटनात्मक संस्था बरखास्त करू नये, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. योगेश दूधपचारे, प्रा. नीलेश ढेकरे, डॉ. हितेंद्र धोटे, डॉ. शुभाष गिरडे, डॉ. कोसे, प्रा. कोरडे, किरणकुमार मनुरे, प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. पुरूषोत्तम बोरकर, संचालन डॉ. मीनाक्षी जुमडे यांनी केले. आभार डॉ. देशमुख यांनी मानले.उच्च शिक्षण क्षेत्रात १८ हजार ३०० पदे रिक्तप्रा. अजित जाचक म्हणाले, उच्च विभागात १८ हजार ३०० रिक्त पदे आहेत. याचा शिक्षित वर्गावर दूरगामी परिणाम होत आहे. महाराष्ट्र प्राध्यापक संघटना व नुटा समान कामास समान वेतन याप्रमाणे कंत्राटी प्राध्यापकांना वेतन मिळावे म्हणून लढा देत आहे. डॉ. नितीन कोंगरे यांनी शिक्षण क्षेत्राबाबत सरकार गंभीर नाही. २००५ नंतरच्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू न झाल्याने अन्याय होत आहे. विविध विद्यापीठाअंतर्गत नामनिर्देशित केलेल्या शिक्षकांमुळे सोयीची वर्णी लागत असून शिक्षण क्षेत्रात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. यातून शिक्षण क्षेत्र गढूळ होत असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. नामनिर्देशनाची त्रस्त पद्धत लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या सभेत करण्यात आली.