शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाभिमुख शिबिरातून मिळाली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:03 IST

श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देअड्याळ टेकडी : जीवन शिक्षण शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला.अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी सुबोध दादा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस चाललेल्या जीवनशिक्षण शिबिरात अध्ययन, व्यायाम व उद्योग आदी विषयांचे जीवनोपयोगी धडे देण्यात आले. ध्यान, भजन, ग्रामगीता अध्ययन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गीताचार्य तुकाराम दादा यांचा जीवन परिचय, श्रमदान, आदर्श दिनचर्या, आहारशास्त्र, निसर्गोपचार आणि आयुर्वेद, योगा, क्रीडा व लघुउद्योगांची माहिती देण्यात आली. मंजन, अमृतधारा, आसन पत्रावळी बनविणे, चटई, धुपबत्ती, चरखा , कपडा विनाई आदी विविध विविध विषय प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. सुबोधदादा, वा.ग.वैद्य गुरूजी , लोकेश मुळे, रेखा बुराडे, गंगाबाई काकडे, लक्ष्मी गुरूनुले, विलास सावरकर, अनिल गुडधे, सुनील राठोड, सुनील पाथोडे, रत्नाकर मेश्राम, दयाराम कुत्तरमारे आदींनी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान दिले.अड्याळ टेकडीवरील जीवन शिक्षण शिबिरात केवळ परिसरातीलच नव्हे तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्याचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गीताचार्य तुकाराम दादा यांच्या सहवासाने पावन झालेल्या अड्याळ टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात हे शिक्षण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वा. ग. वैद्य, शिवदास कुंभारे, शेंद्रे, प्रमोद माळवे, लालचंद नखाते,फाल्गुन राऊत, बन्सोड, आंबटकर गुरूजी, जगदीश वैद्य, मंजुळा काकडे आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांनुसार आदर्श समाज घडविण्यासाठी टेकडीवर विविध उपक्रम वर्षभर आयोजित करण्याची परंपरा यापुढेही सुरू राहणार आहे.