शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरा बॅरेजच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांच्या उपस्थितीत बैठक : जलसंपदा विभागाच्या सचिवांची घोषणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. तथापि, विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदलादेखील दिवाळीनंतर लगेच दिला जाईल, अशी घोषणा जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत केली.२००२ ला मंजूर झालेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. तथापि आता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना.हंसराज अहीर यांनी याप्रकरणी तोडगा काढला असून विशेष बाब म्हणून या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक क्षमतेने शेतकºयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आता ५७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. पूर्वी या प्रकल्पातून केवळ १९ दलघमी पाणी देण्याचे ठरले होते. तथापि औद्योगिक वापरासाठी आता पाणीसाठा कमी करण्यात आला असून सिंचनासाठी मात्र मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया या प्रकल्पामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना नव्या धोरणानुसार मोबदला उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अनेक शेतकºयांनी न्यायालयीन प्रक्रियाही सुरू केली होती. त्यामुळे हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. तथापि, राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाला पुनर्जिवित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूणच सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकºयांनी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीला शेतकºयांची देखिल उपस्थिती होती. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता बलवंत स्वामी उपस्थित होते.