शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल १७ पर्यंत सर्व शाळा डिजिटल करण्याचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 00:43 IST

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा एप्रिल २०१७ पर्यंत डिजिटल करण्याचा संकल्प जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने केला आहे.

शिक्षण विभाग : ब्रह्मपुरी, राजुरा, चंद्रपूर येथे कर्मचाऱ्यांचे वर्गघनश्याम नवघडे नागभीडजलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा एप्रिल २०१७ पर्यंत डिजिटल करण्याचा संकल्प जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने केला आहे. यासाठी आवश्यक घटकांच्या बैठकी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर नुकत्याच पडल्या.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांनी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यशाळेत यासंदर्भात सुचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण विभागाचे आयुक्त यांनीही या संदर्भात निर्देश दिले होते. या सुचना आणि निर्देशानुसारच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.शाळा व वर्ग डिजिटल करणे आणि यासाठी ग्रामस्तरावरून जिल्हास्तरापर्यंत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी ज्यांनी धुळे जिल्ह्यातील संपुर्ण शाळा डिजीटल करण्याची चळवळ उभी केली. आणि शाळा डिजीटल केल्या ते हर्षल विभांडिक यांचे ‘क्लास’ चंद्रपूर जिल्ह्यात आयोजितही करण्यात आले. या क्लाससाठी डिजिटल शाळेसाठी आवश्यक घटक ठरणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना निमंत्रीत करण्यात आले.हर्षल विभांडीक यांच्या क्लासचा सर्वांना व्यवस्थित लाभ मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि राजुरा येथे बैठकी आयोजित करण्यात आल्या. ब्रह्मपुरीची १० फेब्रुवारी तर चंद्रपूर व राजुऱ्याची बैठक ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.सुत्राच्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या बैठकीत शाळेला टी.व्ही. प्रोजेक्टर, साफ्टवेअर आदी साहित्य ग्रामपंचायतीनी उपलब्ध करून द्याव्यात व या साहित्याची तरतुद १४ व्या वित्त आयोगातून करावी अश्या सुचना या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. याच बैठकीत एका मुख्याध्यापकाने विद्युत बील भरण्यासाठी अनेकदा शाळेजवळ पैसा राहत नाही. त्यामुळे शाळेला वीज बिल भरण्यासाठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे विद्युत बिलाचीही तरतुद ग्रामपंचायतीमार्फतच व्हावी, अशी सूचना केली आहे.