शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांना ‌लेखनिकाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST

चंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे पालकांची चिंता वाढली असून ...

चंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे पालकांची चिंता वाढली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना यावर्षी लेखनिक मिळणे कठीण होणार आहे.

२९ एप्रिलपासून दहावीची, तर २३ एप्रिलपासून ते २१ मेपर्यंत बारावीची परीक्षा घेण्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात दहावीचे १८ हजार ६९० विद्यार्थी, तर १६ हजार ३९१ विद्यार्थिनी असे एकूण ३५ हजार ८१ विद्यार्थी, तर बारावीचे २८ हजार ७८९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने तयारीही सुरू केली आहे. मात्र, कोरोनाचे संकट घोंघावत असल्यामुळे साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक मिळणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. सोशल डिस्टन्ट तसेच इतर नियम असल्यामुळे यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यासाठी अडचणीचे ठरणार असल्याचे एकूणच चित्र आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तसेच बोर्डानेही वेळीच दखल घेत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

बाॅक्स

दिव्यांग परीक्षार्थी

दहावी-

बारावी-

पालक काय म्हणतात.

लेखनिक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे लहान बालकांना पालक शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. तर वयाने मोठे असलेल्यांना बोर्ड लेखनिक म्हणून परवानगी देण्यास तयार नाही. त्यामुळे मोठा प्रश्न पडला आहे. बोर्डाने याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवा.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लेखनिक मिळणे कठीण जाणार आहे. बहुतांश पालक लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे परीक्षेच्या वेळी धावपळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यावर्षी बोर्डाने नवे धोरण आखणे गरजेचे आहे.

कोट

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावर्षी कोरोनामुळे पालकांमध्ये चिंता असली तरी कोरोनाविषयक सूचनांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. दिव्यांग्य विद्यार्थ्यांना लेखनिकाबाबत बोर्डाकडून सूचना येईल. त्यानुसार त्यांना लेखनिक पुरविण्यात येणार आहे.

-उल्हास नरड

शिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प., चंद्रपूर