शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म, लघु व्यवसायांवर अवकळा; हजारो हात रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार ...

चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार मिळत होता. परंतु, गुंतवणुकीसाठी शासनाकडून भांडवल मिळण्यास अनेक अडचणी वाढल्या. ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने मागणीला उठाव नसतानाच कोरोनाने पुन्हा संकटात घातली. त्यामुळे सूक्ष्म व लघु व्यवसायांवर अवकळा आली असून हजारो हात रिकामे आहेत.

नऊ तालुक्यांतील रोजगाराची स्थिती तर चिंताजनक असल्याचे वास्तव पुढे आहे.

जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६५ टक्क्यांहून जास्त आहे. प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागात राहणाऱ्या या समुदायाला शेतीतून वर्षभर रोजगार मिळणे कठीण आहे. थोडेफार शिक्षण घेतलेली नवीन पिढी शेतातील कष्टाची कामे करण्यास कचरते शिवाय, शेतीसमोरही अनेक संकटे उभी आहेत. अशा स्थितीत या भागातील कृषीपूरक व्यवसाय संस्था, दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल्स उपहारगृहांमध्ये सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्तींना रोजगार मिळत होता. २०१८-१९ या कालावधीत सूक्ष्म व लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांकडून सहजपणे भांडवल मिळत होते. मात्र, त्यानंतर स्थिती बदलली. कोरोनाकाळाने तर समस्यांची तीव्रता पुन्हा वाढविली. त्यामुळे हजारोंना रोजगार पुरविणाऱ्या सूक्ष्म-लघु व्यवसायांवर अवकळा आल्याचे उद्योग विभागाच्या अहवालातून दिसून येते.

कृषी क्षेत्रावर वाढला ताण

सन २०१७-१८ वर्षात २३ हजार ४८२ दुकानांतून २० हजार २२० व्यक्तींना रोजगार मिळाला. व्यापारी संघ ११ हजार ५४० व्यापारी संघातून १३ हजार ३८०, १ हजार ७३ हॉटेल उपहारगृह ४ हजार ७३९ व तत्सम सूक्ष्म व्यवसायातून ग्रामीण भागातील ३८ हजार ४२३ कामगारांच्या हाताला मिळाले. त्यामुळे शेतीवरील ताण हलका झाला परंतु, सध्याचे चित्र उलट झाल्याचे दिसून येत आहे.

२०१८ पासून रोजगारात घसरण

सन २०१८-१९ मध्ये ४ हजार ४७१ दुकानांमधून ११ हजार ५४७ जणांना रोजगार मिळाला. शिवाय, २ हजार ६९८ व्यापारी संस्थांमधून ११ हजार १०१ व्यक्तींना, ४४५ व्यापारी संस्थांमधून १ हजार ४८० व इतर संस्थांकडून २४ हजार ६३६ व्यक्तींना रोजगार मिळाला होता. २०७-१८ च्या तुलनेत १३ हजार ७८७ जणांचा रोजगार हिसकावला. सन २०१८-१९ पासून तर २०२० पर्यंत सातत्याने रोजगारात घट होत आहे.

पाच तालुक्यांतच रोजगाराच्या संधी

दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृह तसेच तत्सम सूक्ष्म व्यवसाय वर्गवारीत चिमूर, नागभीड, सावली, सिंदेवाही, भद्रावती, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रोजगाराचे मार्ग बंद झाले. मात्र, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल व बल्लारपूर तालुक्यात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

सूक्ष्म उद्योगातील गुंतवणूक (लाखात)

वरोरा १३५, चिमूर १२०, नागभीड ११७, ब्रह्मपुरी १५१, सावली ३०, सिंदेवाही ५१, भद्रावती ११४, चंद्रपूर १५६८, मूल ६१६, बल्लारपूर १०४, पोंभुर्णा ७५, कोरपना ६२, राजुरा ७४, गोंडपिपरी ४३ व जिवती तालुक्यातील सूक्ष्म उद्योगांसाठी ३६ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये गुंतवणूक घटल्याने सूक्ष्म उद्योगांमध्ये रोजगार पुरविण्याची क्षमताही कमी झाली नाही.