शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव उपसा सिंचन योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:30 IST

मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा अपेक्षाभंग : निधी मंजूर होऊनही सिंचन प्रकल्पाचे काम अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी सिंचनाचे स्वप्न भंगल्याचे दिसून येत आहे.दहेगाव-माणकापूर या दोन्ही गावांत आदिवासींची संख्या मोठी आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनाम्यानुसार प्रकल्पाची किंमत २५ लाख २० हजार ४६७ रुपये एवढी आहे. २१ लाख रुपये खर्च करून फक्त उमा नदी काठावर एक पंपघर आणि नदीमध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. पंप घराला अल्पावधीतरच तळे गेल्याचे दिसून येते. पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या कामावर २१ लाख रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. पण प्रकल्प पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उमा नदीपासून तर दहेगावपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली. पाणी उपशासाठी दोन मोठे मोटारपंप खरेदी करण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रकल्पस्थळी कोणतीही यंत्रे दिसून आली नाहीत. प्रकल्पाला सात वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचले नाही. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीची सुधारणा होईल, असे वाटत होते. पण दहेगाव-माणकापूर या डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदिवासींचा अद्याप कोणताही फायदा झाला नाही. ही गावे चिंचाळा- केळझर जि.प. क्षेत्रात येते. या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. दहेगाव उपसा सिंचन योजना यशस्वी झाल्यास आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. पारंपरिक पिके टाळून शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करू शकतात. सरकारने जलशिवार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचनाची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उपसा सिंचन प्रकल्पांची उपेक्षा होत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.